उपसरपंचाकडे बेकायदेशीर हत्यारे

By Admin | Updated: November 18, 2016 06:01 IST2016-11-18T06:01:47+5:302016-11-18T06:01:47+5:30

गावचे उपसरपंच गणेश दत्तात्रय रोडे यांच्याकडे बेकायदा हत्यारे मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची

Illegal killers to the sub-sector | उपसरपंचाकडे बेकायदेशीर हत्यारे

उपसरपंचाकडे बेकायदेशीर हत्यारे

शिरूर : करडे (ता. शिरूर) गावचे उपसरपंच गणेश दत्तात्रय रोडे यांच्याकडे बेकायदा हत्यारे मिळून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्यासह पोलीस पथक शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना न्हावरे येथे रोडच्या कडेला एक इनोव्हा गाडी संशयितरीत्या उभी असलेली आढळली. गाडीतील व्यक्तीस पोलिसांनी नाव विचारले असता त्यांनी रोडे नाव असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, रोडे हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. गाडीच्या मागील सीटच्या खाली पोलिसांना पिवळ्या रंगाच्या मुठी असलेल्या तलवारी तसेच सीटखाली गावठी पिस्तूल व ४ राऊंड मिळून आले. (वार्ताहर)

Web Title: Illegal killers to the sub-sector