शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा खोदकाम थांबविले

By admin | Updated: April 29, 2016 01:27 IST

निक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.

बिबवेवाडी : प्रभाग क्रमांक ७२ अप्परचे स्थानिक नगरसेवक दिनेश धावडे यांनी या भागातील नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांच्याच प्रभागात पालिकेच्या नियमांना केराची टोपली दाखवत सुरू असलेले खोदकाम थांबवले.प्रभाग क्रमांक ७२ मध्ये एका खासगी कंपनीचे केबल टाकण्याचे काम बुधवारी (दि. २७) सुरू करण्यात आले होते. अप्पर रोड ते महेश सोसायटी या रस्त्यावर ६०० मी. रस्ता खोदून केबल टाकण्याच्या कामाला पालिकेने काही अटी देऊन परवानगी दिली होती. मात्र, पालिकेच्या या अटींना केराची टोपली दाखवत या कंपनीचे काम सुरू होते. या कामाची पाहणी करणे, ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे ते अधिकारी या कामावर फिरकलेदेखील नाहीत. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक दिनेश धावडे यांना याबाबत माहिती दिल्यानंतर धावडे यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता वर्कआॅर्डरवर असलेले अनेक नियम पायदळी तुडवत हे काम सुरू असल्याचे धावडे यांच्या लक्षात आले. धावडे यांनी या ठिकाणी स्थानिक पत्रकार तसेच पालिका अधिकाऱ्यांना बोलावले; परंतु एकही पालिका अधिकारी संपर्क करूनही पाहणीसाठी आले नाहीत.दिनेश धावडे यांनी पालिकेत जाऊन मुख्य अभियंता पथ विभाग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्र देऊन हे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश पथ विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिले आहेत. या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे, की वर्कआॅर्डरमधील सांगितलेल्या अटीनुसार पथ विभागाकडील अभियंत्याशी संपर्क साधून त्यांच्या सूचनेनुसार काम करणे आवश्यक असताना त्याप्रमाणे काम केले नाही. काम सुरु करण्यापूर्वी संबंधित मनपाच्या अभियंत्याकडून खोदाईची आउटलाइन मान्य करून घेणे आवश्यक असताना त्याप्रमाणे कार्यवाही केलेली नाही. तसेच जागेवर विहित नमुन्यातील (परवानगीचा दिनांक नमूद करून व आवश्यक सूचना नमूद करून) बोर्ड लावणे आवश्यक असताना त्याप्रमाणे बोर्ड लावलेला नाही. (वार्ताहर)>नियम पाळायला हवेत४एका वेळी १०० मी.पर्यंत खोदाई हाती घेणे आवश्यक असताना जागेवर एकाच वेळी सुमारे २०० मीटरहून अधिक खोदाईचे काम चालू केले आहे. पालिकेचे नियम पाळून संबंधित कंपनीने व त्यांच्या ठेकेदारांनी कामे केली असती तर आज संपूर्ण पुणेकरांना या रस्ते खोदाईच्या त्रासातून मुक्ती मिळाली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.