‘पुण्यात आयआयएमची उभारणी करावी’

By Admin | Updated: December 18, 2014 04:38 IST2014-12-18T04:38:58+5:302014-12-18T04:38:58+5:30

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातही इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (

'IIM should be set up in Pune' | ‘पुण्यात आयआयएमची उभारणी करावी’

‘पुण्यात आयआयएमची उभारणी करावी’

पिंपरी : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१४ च्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेनुसार पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातही इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) उभारावे, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्याकडे केली आहे.
पुणे आणि पिंपरी - चिंचवड ही झपाट्याने विकसित होणारी शहरे आहेत. महापालिकेच्या हद्दीत पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, मोशी आणि सांगवी अशा मोठ्या नगरांचा समावेश आहे. औद्योगिक क्षेत्रात छोटे-मोठे अनेक कारखाने आहेत. आयटी क्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक शैक्षणिक संस्था या भागात आहेत. त्यामुळे व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणाऱ्या आयआयएमची शाखा या भागात सुरू करावी, अशी आग्रही मागणी बारणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'IIM should be set up in Pune'