किचकट प्रक्रियेमुळे विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 6, 2014 00:32 IST2014-11-06T00:32:58+5:302014-11-06T00:32:58+5:30
शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते.

किचकट प्रक्रियेमुळे विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष
सुवर्णा नवले, पिंपरी
शहरात विवाह नोंदणी करण्यासाठी नागरिकांमध्ये उदासीनता असल्याचे दिसून येत आहे . विवाह नोंदणीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करणे ही किचकट प्रक्रिया नागरिकांना वाटते. यामुळे नागरिक विवाह नोंदणीला धजावत नाहीत.
शहरातील नागरिकांचे असे मत आहे की, विवाह नोंदणीसाठी कागदपत्रे मोठया प्रमाणात जमा करावे लागतात. विवाह नोंदणी विभागातून अथवा नागरी सुविधा केंद्रातून विवाह संबंधी कागदपत्राची मोठी यादी मिळते. नागरिकांकडे सर्व कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यांना अर्धवट माहिती यासंदर्भात असते.
विवाह नोंदणी संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रांमध्ये नागरिकांना शहरातील वधू किंवा वर रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे़ तसेच विवाह नोंदणी अर्जावर वधू व वर यांचे साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फ ोटो लागतात. नोंदणीसाठी १०० रूपये किंमतीचा कोर्ट फी स्टँप विवाह नोंदणीसाठी लागतो. वधू व वर यांच्या जन्म तारखेचा पुरावा व शाळा सोडल्याचा दाखला, हे उपलब्ध नसल्यास नोंदणी धारकांचा वाहनपरवाना अथवा पासपोर्ट लागतो.
विवाह नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका लागते ती नसल्यास विवाहाचा फ ोटो लागतो. वर व वधू घटस्फोटीत असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची प्रत लागते. विवाह झाल्याचा कार्यालयाचा दाखला तसेच विवाह लावलेल्या भटजीची स्वाक्षरी लागते. या सर्व कागदपत्रामुळे नागरिक विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष करतात.
विवाह नोंदणीसाठी १५ दिवसाच्या आत कागदपत्रांची तपासणी करून विवाह प्रमाणपत्र दिले जाते. असे विवाह अधिनियाममध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी कायदा १९९८ कलम ५ व ६ प्रमाणे हा अधिनियम आहे. १५ दिवसाचा एकूण विवाह नोंदणी कालावधी आहे. मात्र १५ दिवस उलटून गेल्यानंतरही नागरिकांना प्रमाणपत्र मिळत नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. विवाह नोंदणी ही महत्त्वाची बाब आहे. नागरिक महत्त्वाची गरज भासल्यास विवाह नोंदणीकडे वळतात. तेव्हा लगेच नोंदणी होत नाही.