स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: November 12, 2014 00:01 IST2014-11-12T00:01:27+5:302014-11-12T00:01:27+5:30
स्वदेशीचा स्वीकार करून विदेशी कपडय़ांची होळी करून स्वातंत्र्य रणात जाज्वल्य क्रांतिपर्व निर्माण करणा:या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची सध्या दैना झाली आहे.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष
पुणो : स्वदेशीचा स्वीकार करून विदेशी कपडय़ांची होळी करून स्वातंत्र्य रणात जाज्वल्य क्रांतिपर्व निर्माण करणा:या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची सध्या दैना झाली आहे. ‘माझी समुद्रातील उडी विसरलात तरी चालेल; परंतु माङो सामाजिक कार्य विसरू नका,’ असे भावनिक आवाहन करून देह ठेवलेल्या सावरकरांच्या स्मारकाला सध्या अस्वच्छतेने घेरले आहे.
डेक्कन येथील विमलाबाई गरवारे प्रशालेसमोर स्वातंत्र्यवीरांचे हे स्मारक आहे. ‘अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला’ या त्यांच्याच काव्यपंक्ती मिरवीत उभे असलेले हे स्मारक म्हणजे राष्ट्रभक्ती आणि जाज्वल्य अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. याच ठिकाणी सावरकरांनी 19क्5मध्ये महाविद्यालयीन मित्र आणि सहका:यांच्या मदतीने विदेशी कपडय़ांची ऐतिहासिक होळी केली होती. या आंदोलनामध्ये त्या वेळी लोकमान्य टिळकांनी सहभाग घेतला होता. तरुणांमध्ये स्वातंत्र्याचे आणि देशभक्तीचे स्फुल्लिंग चेतविणारे भाषण त्या वेळी टिळकांनी केले होते. या विदेशी कपडय़ांच्या होळीमुळे प्रभावित होऊन अनेक तरुण इंग्रजांविरुद्ध पेटून उठले होते.
या ठिकाणी पुणो महापालिकेच्या वतीने एक सुंदर स्मारक उभारण्यात आले. या स्मारकाचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते 1क् ऑक्टोबर 2क्क्3 रोजी करण्यात आले होते. या वेळी तत्कालीन खासदार प्रदीप रावत, महापौर दीप्ती चौधरी, आमदार विनायक निम्हण, इतिहासतज्ज्ञ श्रीपती शास्त्री आदी उपस्थित होते. स्मारकाच्या मधोमध विदेशी कपडय़ांच्या होळीचे आकर्षक आणि सुंदर असे म्युरल तयार करण्यात आलेले आहे. तर, आवारामध्ये सावरकरांचा एक अर्धाकृती पुतळाही आहे. परंतु सध्या या स्मारकाला धुळीने माखले आहे. या स्मारकाच्या गेटला कायमच कुलूप घातलेले असल्यामुळे नागरिकांना तेथे जाता येत नाही.
विजेच्या तारा आणि भेंडोळे
4स्मारकाच्या डाव्या बाजूला लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे यांचीही म्युरल आहेत. या कोप:यामध्ये वायरचे भेंडोळे पडलेले असून, डीपीमधून गेलेल्या या वायर धोकादायक अवस्थेत लटकत आहेत. तसेच, सावरकरांच्या पुतळ्याच्या बाजूला दिवे तुटून खाली पडलेले आहेत. जागोजाग वायर तुटलेल्या असल्यामुळे विजेचा शॉक बसण्याची शक्यता आहे.
4स्मारकाच्या देखभालीकरिता रखवालदाराची नेमणूक करण्यात आलेली आहे; परंतु रखवालदाराला बसण्यासाठी असलेल्या केबिनमध्ये सिमेंटची पोती आणि अन्य साहित्य ठेवल्यामुळे त्यालाच बसण्यासाठी इतरत्र जागा शोधावी लागत आहे. या केबिनच्या बाजूला आणि पाठीमागे कचरा आणि बांधकामाचे साहित्य पडलेले आहे.