शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्वर्ण्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष : दिशा केने-शेख; पुण्यात तेजस्विनी चिंतन परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 12:31 IST

सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देमराठी साहित्य परिषद, तेजस्विनी संस्था व राज्य युवा परिषदेच्या वतीने परिषदेचे आयोजनस्त्रीला आजही एक वस्तू समजले जाते : दिशा शेख

लोणी काळभोर : आजच्या काळात पुरोगामित्वाचा कितीही आव आणला जात असला, तरी चातुर्वर्ण्याच्या प्रभावामुळे स्त्रियांचे प्रश्न दुय्यम मानले जात आहेत. सामाजिक दबावामुळे काम करून घर सांभाळणे ही मानसिकता तयार झाली असल्याने निर्भयासारख्या घटना घडतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या दिशा केने-शेख यांनी व्यक्त केले. मराठी साहित्य परिषद (पुणे जिल्हा शाखा), तेजस्विनी संस्था व राज्य युवा परिषदेच्या वतीने तेजस्विनी चिंतन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कावेरी कुंजीर अध्यक्षस्थानी होत्या. डॉ. अलका नाईक, शुभालिनी देसाई, मंजूश्री साबू या वेळी उपस्थित होत्या. दिशा शेख म्हणाल्या, माता, भगिनी, पत्नी, कन्या, सखी, आदी रूपांत स्त्रीने मानवी जीवनांत आपले अलौकित्व सिद्ध केले आहे. त्याअनुषंगाने त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व व सामर्थ्य खऱ्या अर्थाने समोर येत आहे. असे असतानाही स्त्रीला आजही एक वस्तू समजले जाते. अर्धांगी हा शब्द नावाला आहे. लग्न ठरवताना मुलगी सामाजिक दबावामुळे होकार देते व अनोळखी व्यक्तीसमवेत लग्न करते. आपण उघड बलात्काराबद्दल बोलतो; परंतु पतीबरोबरचा पहिला संभोगदेखील बलात्कारच असतो हे आपण विसरतो. बलात्कार कपड्यांनी नाही तर मानसिकतेतून होतो व त्यातूनच दिल्ली, खैरलांजी, कोपर्डीसारख्या घटना घडतात. अशा घटना घडू नयेत म्हणून यापुढे पुरुषांच्या मानसिकतेचा अभ्यास करून हुकूमशाही समजून घ्यावी लागणार आहे.’ पाहुण्यांची ओळख गणेश सातव यांनी करून दिली. राजकुमार काळभोर यांनी आभार मानले.

टॅग्स :Maharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदDisha Shaikhदिशा शेखPuneपुणे