शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती अन् देवीच्या आरतीने इफ्तार पार्टीची सुरुवात, सरोदेंनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:47 IST

सध्या रमजानचा महिना असल्याने इफ्तार पार्ट्या होत आहेत

मुंबई - राज्यातील घडामोडींवर नेहमीच कायदेशीर बाजू मांडणारे नामवंत विधिज्ञ असीम सरोदे यांनी भोंग्याच्या वादावर मत मांडलं होतं. त्यानंतर, नास्तिक मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र, 24 एप्रिल रोजी तोच मेळावा शांततेत पार पडल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सोशल मीडियावरुन नेहमीच एक्टीव्ह असणाऱ्या अॅड. सरोदे यांनी एका आगळ्या-वेगळ्या इफ्तार पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या वातावरणात हा व्हिडिओ दोन्ही धर्मांबद्दल एकमेकांचा सन्मान वाढवणारा आहे. 

सध्या रमजानचा महिना असल्याने इफ्तार पार्ट्या होत आहेत. हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येत इफ्तार पार्ट्यांना हजेरी लावत एकतेचा संदेश देतात. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीला सेलिब्रिटी आणि मंत्रीही हजर होते. आता, पुण्यातील नामवंत वकिल असीम सरोदे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, आपण आयुष्यात पहिल्यांदाच इफ्तार पार्टीला हजेरी लावल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे या इफ्तार पार्टीची सुरुवात गणपती आणि माती दुर्गा देवीची आरती करुन करण्यात आली. त्यामुळे, या इफ्तार पार्टीला मी हजर राहिलो, असेही त्यांनी सांगितलं. ''काल आयुष्यत पहिल्यांदा इफ्तार पार्टी ला गेलो. मुस्लिम समाजातील रीती रिवाज माहिती करून घ्यावेत असे अनेकदा वाटते. इफ्तार पार्टीला जाण्याचे कारण वेगळे होते. या पार्टीची सुरुवात मुस्लिम समाजातील काही लोक गणपती, दुर्गादेवी यांची पूजा करून करणार होते.'', असे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच, या आरतीचा व्हिडिओही शेअर केला आहे.  नास्तिक मेळाव्यावरही केलं भाष्य

पोलिसांनी १० एप्रिलच्या मेळाव्याला मनाई करण्याचे कारण काय, तर त्यादिवशी रामनवमी असल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशी तक्रार पोलिसांकडे आली होती. समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या तरल असतात आणि त्या फट म्हणता दुखावतात, असा एक सर्वसाधारण समज आहे. मग रामनवमीनंतर दोन आठवड्यांनी या भावना बधिर किंवा बोथट झाल्या असे समजायचे का? मेळाव्यात झालेली भाषणे चिथावणी देणारी, प्रक्षोभक किंवा देव-देवतांची टिंगल-टवाळी करणारी असती तर धार्मिक भावना दुखावल्या जायला किंवा शांतता भंग करायला कारणीभूत ठरली असती; पण या मेळाव्याचे वातावरण तर एकदमच वेगळे होते.  

टॅग्स :PuneपुणेAsim Sarodeअसिम सराेदेMuslimमुस्लीम