शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणून दम दिला जातोय; शरद पवारांचा अजित पवारांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:09 IST

तुमची विकास कामे करणार नाही अशी भाषा वापरली जाते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण दम देतो आहोत त्या पदापर्यंत कोणी आणले हे विसरता कामा नये

सुपे (बारामती: सद्याचे सरकार शेतकरी विरोधी असुन त्याच सरकारमध्ये काही सहभागी होऊन आम्हालाच मतदान करा असा दम देत आहेत. मात्र जे दम देत आहेत त्यांना त्या जागेवर कोणी बसवलं आहे हे तुम्हाला अधिकसांगायची गरज नाही. असा अप्रत्यक्ष टोला माजी केंद्रिय कृषी मंत्री शदर पवार यांनी अजित पवार यांना लगावला.           सुपे येथील पुजा गार्डन येथे जनसंवाद दौऱ्याच्यानिमित्ताने शरद पवार बोलत होते. सद्याचे सरकार हुकुमशाहासारखे वागत असुन लोकशाहीचे अधिकार उद्धस्थ करण्याचे काम करीत आहे. तसेच सत्तेचा गैरवापर करुन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम त्यांनी केले. या सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवली. त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याचा आणि सोयाबिन पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. या सरकारला निवडणुकित शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.          तुम्ही ज्यांना आधी निवडून दिले त्यांनी संसदेत तुमचे प्रश्न मांडले. त्यात सुप्रिया सुळेंचे नाव पहिले असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला. जनाई - शिरसाई उपसा जलसिंचन योजना कोणी राबवली हे शेतकऱ्यांना सांगु नये. मी दिल्लीतील काम पहात असताना राज्याची जबाबदारी तालुक्यातील प्रतिनिधीकडे दिली होती. पण त्यांनी काय दिवे लावलेत हे आता पाहतोय. 

यावेळी सभेत पवार बोलत असताना एक चिठ्ठी व्यासपिठावर आली. त्यात जनाई - शिरसाईचे पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणुन दम दिला जातो. अन्यथा तुमची विकास कामे करणार नाही अशी भाषा वापरली जाते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की आपण दम देतो आहोत त्या पदापर्यंत कोणी आणले हे विसरता कामा नये असा खोचक टोला पवार यांनी अजित पवार यांना लगावला. 

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण