शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळात काहीतरी थंड हवंय तर मग पुण्यातल्या या नऊ ठिकाणांना जरुर भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 19:46 IST

तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला काहीतरी थंड पेय पिण्याची किंवा आयस्क्रिम खाण्याची इच्छा आहे तर पुण्यातील या आठ ठिकाणांना जरुर भेट द्या.

पुणे : उन्हाळा सुरु झाल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या चटक्याने घामाच्या धारा निघत असतात. अशातच एखादं खंड पेय किंवा आयस्क्रिम मिळाली तर उन्हाचा कडाका कमी हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे तुम्ही पुण्यात असाल आणि तुम्हाला काहीतरी थंड पेय पिण्याची किंवा आयस्क्रिम खाण्याची इच्छा आहे तर पुण्यातील या नऊ ठिकाणांना जरुर भेट द्या. 

सुजाता मस्तानी मस्तानी म्हंटलं की सुजाता मस्तानीचं नाव समाेर येतं. सुजाता मस्तानीची पुण्यात अनेक दुकाने आहेत. एकदा सुजाता मस्तानी प्यायली की माणूस पुन्हा पुन्हा या दुकानात येताे. काेथरुड, कर्वे रस्ता या ठिकाणी सुद्धा सुजाता मस्तानी मिळते. या मस्तानिची चव खूप काळ चिभेवर रेंगाळत राहते. 

कावरे आईस्क्रिम आईस्क्रिमसाठी फेमस असलेलं ठिकाण म्हणजे कावरे आयस्क्रिम. याठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या आईस्क्रिम खायला मिळतात. येथील कसारा आईस्क्रिम जास्त फेमस आहे. तुळशीबाग या ठिकाणी कावरे आयस्क्रिम मिळते. 

गुजर काेल्ड्रिंग हाऊस गुजर काेल्ड्रिंग हाऊस म्हंटलं की बाजीराव मस्तानी समाेर येते. या काेल्ड्रिंग हाऊसला माेठा इतिहास देखील आहे. जुन्या पुण्यातलं खूप वर्षांपासून सुरु असलेलं असं हे काेल्ड्रिंग हाऊस आहे. दगडू शेठ दत्तमंदिंराजवळ हे काेल्ड्रिंग हाऊस आहे. 

कैलास लस्सीरास्ता पेठेतील अपाेलाे टाॅकीज जवळ मिळणारी कैलास लस्सी पुण्यातली फेमस लस्सी आहे. दिवसभर येथील लस्सी पिण्यासाठी माेठी गर्दी असते. कैलास लस्सीची पुण्यात विविध ठिकाणी आठ दुकाने आहेत. उन्हाळ्यात या ठिकाणची लस्सी पिण्याची मजाच वेगळी असते. 

मटका कुल्फीराजस्थानी प्रकारची मटका कुल्फी पुण्यात फेमस आहे. पुण्यातल्या विविध भागात ही कुल्फी मिळते. खासकरुन डेक्कन भागात मिळणारी राजस्थानी कुल्फी खाण्यासाठी पुणेकर गर्दी करतात. त्यामुळे तुम्हाला कुल्फी खायची असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे.

पूना काेल्ड्रिंग हाऊसटिळक रस्त्यावरील पूना काेल्ड्रिंग हाऊस हे सुद्धा पुण्यातील जुने दुकान आहे. येथे विविध प्रकारच्या आईस्क्रिम खायला मिळतात. येथील फालुदा फेमस आहे. 

बुवा आईस्क्रिम हाऊस  जसं या आईस्क्रिमच्या दुकानाचं नाव वेगळं आहे तशीच येथील आईस्क्रिम देखील आहे. सदाशिव पेठेतलं हे जुनं दुकान आहे. 

माेहन आईस्क्रिमरविवार पेठेतल्या साेन्या मारुती चाैकात माेहन आईस्क्रिम मिळते. या ठिकाणची बासुंदी जास्त फेमस आहे. त्याचबराेबर वेगवेगळ्या आईस्क्रिम सुद्धा तुम्ही ट्राय करु शकता. 

दुर्गा पुण्यातलं दुर्गा कॅफे प्रसिद्ध आहे. काेथरुड मध्ये असणाऱ्या या कॅफेमध्ये तरुणांची गर्दी असते. येथील काेल्डकाॅफी खूप फेमस आहे. ही काेल्डकाॅफी पिण्यासाठी येथे दिवसभर गर्दी असते. त्यामुळे तुम्ही काेथरुड मध्ये असाल तर येथील काेल्डकाॅफी नक्की ट्राय करा. 

टॅग्स :Puneपुणेfoodअन्न