चाकण : व्याज व पैसे दिले नाहीतर, तुमच्या मुलाचे हातपाय तोडून टाकीन याप्रकारे जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी चाकण येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १५ सप्टेंबर २०१५ पासून २१ मार्च २०१८ दरम्यान घडली. सुदाम रंगनाथ गारगोटे (वय ७५, रा. वाकी बुद्रुक, ता.खेड) यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मंदार परदेशी ( रा.चाकण, ता.खेड ) याच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा विजय गारगोटे याने परदेशी याच्याकडून उसने घेतलेल्या दीड लाख रुपये उसने घेतले. त्या मोबदल्यात परदेशी याने एकूण ३,६०००० रुपये या मुद्दलापेक्षा जास्त व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावून फिर्यादीच्या घरी जात व मोबाईलवरून ,पैसे व व्याज दिले नाही तर मी तुमच्या मुलाचे हातपाय तोडून टाकीन व तुमचा ट्रक माझ्या दारात उभा करून, तुम्ही दिलेला कोरा चेक व कोरा स्टॅम्प पेपर वरून कोर्टात कायदेशीर कारवाई करील, अशा धमक्या देत दमदाटी केली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
व्याज व पैसे दिले नाहीतर मुलाचे हातपाय तोडून टाकेन ;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:17 IST
विजय गारगोटे याने परदेशी याच्याकडून उसने घेतलेल्या दीड लाख रुपये उसने घेतले. त्या मोबदल्यात परदेशी याने एकूण ३,६०००० रुपये या मुद्दलापेक्षा जास्त व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावून धमकी दिली.
व्याज व पैसे दिले नाहीतर मुलाचे हातपाय तोडून टाकेन ;
ठळक मुद्देचाकण येथे खासगी सावकारावर गुन्हा दाखल