शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विनाकारण बाहेर पडलात तर दंड भरावा लागेल..; पुणे शहरातील काही सोसायट्यांचा आगळा वेगळा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 18:09 IST

सोसायटीमधील कमिटीला पूर्वसूचना न देता एखादी व्यक्ती बाहेरगावावरून कुणाकडे आल्यास, तसेच कुणीही विनाकारण सोसायटीच्या बाहेर पडल्यास त्याला किमान 150 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या काळजीसाठी सोसायटीचा फतवा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगळा वेगळा प्रयोग

 युगंधर ताजणे- 

पुणे : घरातच बसा, घरात राहा, विनाकारण बाहेर फिरू नका. आपल्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्या. असे आवाहन सातत्याने पोलीस करत असून देखील त्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. यावर आता आपल्या सोसायटीमधील रहिवासी विनाकारण बाहेर पडल्यास त्याला दंड करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील काही सोसायट्यांनी हा आगळा वेगळा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. सोसायटीमधील कमिटीला पूर्वसूचना न देता एखादी व्यक्ती बाहेरगावावरून कुणाकडे आल्यास, तसेच कुणीही विनाकारण सोसायटीच्या बाहेर पडल्यास त्याला किमान 150 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्याबरोबरच इतरांच्याही आरोग्याचा विचार करणे अपेक्षित आहे. हा त्यामागील दंडाचा हेतू आहे. कोरोनाचा संसर्ग सतत वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील काही भाग पूर्णत: बंद करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणा?्या विक्रेत्यांना वेळेची मयार्दा घालून दिली आहे. पोलीस प्रशासन युद्धपातळीवर काम करत असताना अद्याप काही नागरिकाडून नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले आहे. यावर खराडी, हडपसर, विमाननगर, केशवनगर, मांजरी या भागातील सोसायटयांनी आपल्या सोसायटी मधील व्यक्तीना विनाकारण बाहेर पडण्यास मनाई केली आहे. या सूचनेचे पालन न केल्यास त्यांना दंड भरावा लागणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, कोरोनावर मात करायची असल्यास घरात राहावे , लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना सहकार्य करावे हा त्यामागील उद्देश असल्याचे सोसायटी मधील रहिवाशांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती देताना मांजरी बुद्रुक  ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित घुले म्हणाले, अद्याप लोकांना परिस्थितीचे गंभीरता समजली नाही. ते बाहेर फिरताना दिसत आहे. अशावेळी त्यांना दंडाची भीती दाखवली गेल्यास त्याउद्देशाने का होईना ते घरात राहतील. एकाच्या चुकीचा फटका सर्वांना सहन करावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे करावे लागेल. 

* सोसायटीचे नियम आहेत त्याच्या चौकटीत राहून सर्व काळजी घेण्यात आली आहे. सुरुवाटीला सोसायटी मध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची तपासणी करून घेण्यात आली. सोसायटी देखील सॅनिटाईज करण्यात आली आहे. रहिवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत. सोसायटीमध्ये कुणीही बाहेरून नवीन व्यक्ती आल्यास त्याची माहिती देण्यास बजावले आहे. व्हाट्स अप ग्रुप तयार करून त्याद्वारे कुणाला काय हवे ते विचारले जाते. सगळ्यांची एकत्रित यादी तयार केली जाते. ती दुकानदाराला पाठविल्यावर त्याच्याकडून ती घेऊन त्या वस्तूंचे वाटप केले जाते. रहिवाशांनी बाहेर पडू नये असे दंड करण्यामागे कारण आहे. - निलेश सोनाग्रा (चेअरमन, बेला व्हिस्टा सोसायटी, विमाननगर) 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpassengerप्रवासी