शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका १५ ऑगस्टच्या आधी जाहीर झाल्यास २ लाख नवमतदार मतदानाला मुकणार; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:29 IST

सध्या अंतिम असलेली अर्थात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या यादीनुसार हे दोन लाख मतदार यादीतून वगळले जाणार

पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घेण्यात येणार असल्या तरी या निवडणुका १५ ऑगस्टनंतर जाहीर झाल्यास जिल्ह्यातील सुमारे दोन लाख मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. मात्र, त्यापूर्वी जाहीर झाल्यास सध्या अंतिम असलेली अर्थात विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या यादीनुसार हे दोन लाख मतदार यादीतून वगळले जातील व जिल्ह्यातील ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार यात सहभागी होतील.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका नगरपालिका नगरपरिषद, तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यानुसार येत्या चार महिन्यांमध्ये या निवडणुका पार पडण्याचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आला आहे; परंतु सध्याचा पावसाळा लक्षात घेता या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे; मात्र या निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीत अंतिम करण्यात आलेली मतदारयादीत वापरण्यात येईल, असेही बोलले जात आहे; मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक जूनपासून सर्व राज्यांमध्ये मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये मतदार याद्यांमध्ये नऊ मतदारांची नावे टाकणे, मृतांची नावे वगळणे, पत्ते बदल, तसेच नव्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर बाराशे मतदारांची संख्या निश्चित करून नव्याने मतदान केंद्र तयार करणे अशी कामे करण्यात येणार आहेत. यानंतर १५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.

निवडणुका जाहीर होतील तेव्हाची यादी अंतिम

निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदार यादीच्या वापरासंदर्भात, सध्या अंतिम असलेली यादी वापरावी, असा शब्दप्रयोग केला जातो. निवडणूक शाखेतील सूत्रानुसार या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका १५ ऑगस्टपूर्वी जाहीर झाल्यास सध्या अंतिम असलेली अर्थात विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली मतदार यादी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी गृहीत धरली जाणार आहे. मात्र, प्रारूप यादी १५ ऑगस्टला जाहीर झाल्यानंतर त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्यास १५ ऑगस्टची प्रारूप मतदार यादी अंतिम धरण्यात येईल. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार पात्र ठरले होते.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिकाVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग