शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींवर मात केल्यास २३ गावांमध्ये विकासाला मोठा वाव: महापालिका आयुक्त विक्रमकुमार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 12:17 IST

पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याबाबत २३ डिसेंबर रोजी प्रारूप अधिसूचना जाहिर झाली आणि या गावांच्या महापालिकेतील समावेशावर शिक्कामोर्तब झाले. 

ठळक मुद्देनव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत

निलेश राऊत-                 पुणे : अनाधिकृत बांधकामे, अरूंद रस्ते, पाणीपुरवठ्या तुटपुंज्या वाहिन्या, बकाल पध्दतीने वाढलेल्या वस्त्या, मोकळ्या इमारती हस्तांतर करताना आर्थिक समस्या आदी अडचणी नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमध्ये आ वासुन उभ्या आहेत. परंतु, योग्य नियोजन झाल्यास या गावांमध्ये चांगल्याप्रकारे विकास कामे करता येईल, असा विश्वास पुणे महापालिका प्रशासनास आहे. त्यामुळे समाविष्ट गावांमधील गैरसोयींच्या पूर्वीच्या धनकवडीच्या परिस्थितीची ‘री’ ओढायची की प्रभात रोड, बालेवाडी भागासारखा सुनियोजित विकास करायचा, याकरिता आता प्रशासनाला लोकप्रतिनिधींसह स्थानिक नागरिकांचे सहकार्य अत्यावश्यक आहे.    पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याबाबत २३ डिसेंबर रोजी प्रारूप अधिसूचना जाहिर झाली आणि या गावांच्या महापालिकेतील समावेशावर शिक्कामोर्तब झाले.  या निर्णयावर हरकती सूचनांसाठी १ महिन्यांचा कालावधी आहे. परंतु, न्यायालयाच्या निर्णयानुसारच ही प्रक्रिया सुरू असून, २०१७ मध्ये ११ व आत्ता २३ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. यामुळे या बाबतची अंतिम अधिसूचना काढताना काही अडचण येणार नाही याची सर्वांनाच जाण आहे.    सदर निर्णयामुळे राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली. ही आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग कसे राहतील, कुठला भाग दुसऱ्या प्रभागात जाईल याची चाचपणी आत्तापासूनच सुरू झाली आहे. याचवेळी नव्याने समाविष्ट होणाऱ्या या २३ गावांमध्ये पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.    कोरोना आपत्तीमुळे कोसळलेले आर्थिक संकट व त्यातच पूर्वीच्या ११ गावांचा व आता नव्या २३ गावांच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाचा ताण याचा ताळमेळ बसविणे हे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. तरीही, ही एक काम करायची संधी आहे असे समजून, नवे काही करून दाखवायचे व खरोखरच ‘स्मार्ट पुणे’ घडविणे हे दिव्य प्रशासन पार पाडायचे आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या प्रशासनाची काय तयारी व काय नियोजन असेल याचा लोकमतने आढावा घेतला.-------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तState Governmentराज्य सरकार