शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घर स्वच्छ ठेवतो, तर शहर अन् देश का नाही ? डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 13:05 IST

संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत.

ठळक मुद्देस्वच्छता राखणे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य

पुणे : साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. त्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.संपूर्ण समाज हे एक मोठे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा आपण प्रत्येकजण भाग आहोत. या भावनेतून प्रत्येकाने स्वच्छता राखावी. ज्याप्रमाणे आपण आपले घर आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवतो. त्याचप्रमाणे शहर आणि देश स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अप्पासाहेबधर्माधिकारी यांनी केले.  सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर ‘स्वच्छता अभियाना’ची घोषणा केली. नुकतीच राज्यपालांनी डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ‘स्वच्छ  भारत अभियाना’चे अग्रदूत (अ‍ॅम्बेसिडर) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  शहरात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले होते.   डॉ. धर्माधिकारी यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, की प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करायला हवा. जमा होणारा कचरा निर्धारित केलेल्या जागी नेऊन टाकला पाहिजे. स्वच्छतेच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबवता येणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेबरोबरच स्वयंशिस्तीतून आपण देशाला जगातील सर्वांत स्वच्छ देश म्हणून नावारुपाला आणू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवताना शहर व देशदेखील स्वच्छ ठेवण्याची भावना मनात रुजविणे गरजेचे आहे.   शहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, एसटी डेपो, पोलीस मुख्यालय व वसाहत या परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. त्याला नागरिक व स्वयंसेवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्वच्छता मोहिमेतून २१० टन कचरा गोळा करण्यात आल्याची  माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. 

शासकीय तिजोरीवर नाही ताणया उपक्रमामध्ये शहराचे घनकचरा विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विरोधी पक्ष नेत्या वैशाली धुमाळ, आदित्य माळवे, भाजप पक्षाचे शिवाजीनगर विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र साळेगावकर, संदीप काळे, मयूर मुंडे, गौरव गोटे उपस्थित होते. शासकीय तिजोरीवर कोणताही अतिरिक्त ताण पडू न देता संपूर्ण परिसरातील लोकांच्या सहकार्याने आणि समन्वयातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याकरिता हातमोजे, मास्क, कचºयाची विल्हेवाट लावणारी उपकरणे या वस्तू प्रतिष्ठानच्या वतीने पुरविण्यात आल्या.

 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान