सुविधा दिल्यास पुण्याचे खेळाडू ऑलम्पिक जिंकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:16 IST2021-09-05T04:16:19+5:302021-09-05T04:16:19+5:30

उरुळी कांचन : प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देऊन आवश्यक असलेल्या सुविधा दिल्या तर पुण्यासारख्या शहरातून अनेक ऑलम्पिक विजेते खेळाडू ...

If facilities are provided, Pune athletes will win the Olympics | सुविधा दिल्यास पुण्याचे खेळाडू ऑलम्पिक जिंकतील

सुविधा दिल्यास पुण्याचे खेळाडू ऑलम्पिक जिंकतील

उरुळी कांचन : प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देऊन आवश्यक असलेल्या सुविधा दिल्या तर पुण्यासारख्या शहरातून अनेक ऑलम्पिक विजेते खेळाडू तयार होतील त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन खेळाडूंना मदत करण्याचे आवाहन निवृत्त पोलीस अधिकारी बापूसाहेब कुतवळ यांनी केले आहे.

पुण्यातील अद्वैत क्रीडा केंद्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन काटेपुरम चौक सांगवी येथे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उरुळी कांचन (ता. हवेली) येथील धनंजय मदने यांना अद्वैत चषक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बापूसाहेब कुतवळ बोलत होते.

यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने, राष्ट्रीय खेळाडू कैलास गायकवाड, राजेंद्र शिरोळे, संजय कांबळे, उद्धव पवार यांना अद्वैत चषक पुरस्कार - २०२१ देण्यात आला.

यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी बापूसाहेब कुतवळ, अध्यक्ष साई स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचे फिरोज खान, अद्वैत क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मदन कोठुळे, संस्थेचे सचिव युवराज दिसले, उद्योजक अच्युत शर्मा मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज दिसले,तर आभार हेमंत बारमुख यांनी केले.

Web Title: If facilities are provided, Pune athletes will win the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.