शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 19:52 IST

शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार लिंक करावे.

पुणे :  केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणा-या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक केले आहे. यामुळेच रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास येत्या १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक शंभर टक्के लिंक करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात  राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे एकूण 13 लाख 32 हजार 871 ऐवढे लाभार्थी आहेत. यापैकी आता पर्यंत 10 लाख 61 हजार 822 (79.66) टक्के इतक्या लाभार्थ्यांचे आधार लिंकीग पूर्ण झाले आहे. अद्याप ही सुमारे तीन लाख पेक्षा अधिक लाभार्थीचे आधार लिंकीग पूर्ण झालेले नाही. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील ekYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. याकरिता दि ३१ जानेवारी २०२१ पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमधील लाभार्थ्यांचे १०० % आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दीष्टाने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ११ परिमंडळ कार्यालयात मोहिम राबविणेत येत आहे. त्याअनुषंगाने धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांच्या आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे.

याबाबत आधारसिडींग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्तभाव दुकाननिहाय यादी तयार करणेत आलेली असुन दि ३१ जानेवारी २०२१ पुर्वी या लाभाध्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक सिडींग करण्याचे निर्देश ११ परिमंडळ कार्यालयांना देणेत आलेले आहेत.

टॅग्स :PuneपुणेAdhar Cardआधार कार्डCentral Governmentकेंद्र सरकार