शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"भ्रष्टाचारी उमेदवार मत मागायला आल्यास अपमान केला जाईल", बारामतीतील बॅनरची सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 13:16 IST

बारामती तालुक्यातील वाघळवाडीसह १३ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत

महेश जगताप

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत संचालकपदाला डावलण्यात आल्याने केळीचे चित्र असलेले बॅनर लावण्यात आले होते. याची चर्चा जिल्हाभर झाली होती.           बारामती तालुक्यातील वाघळवाडीसह १३ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १३ तर सदस्यपदासाठी ६१ जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दि ५ रोजी झालेल्या अर्ज छाननी मध्ये एका सदस्यपदाच्या उमेदवाराचा अर्ज अवैद्य ठरला असून ६० उमेदवार सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात उभे आहेत. आज अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. यामध्ये किती उमेदवार माघार घेतात ते समजणार आहे. 

वाघळवाडी येथील सुरेश किसनराव यादव यांनी या निवडणुकीत आपल्या घरावर एक बॅनर लावला असून तो बॅनर तालुक्याचे लक्ष वेधून घेत आहे. समाजकंटक, भ्रष्टाचारी व भ्रष्टाचारीला अभय देणाऱ्या उमेदवार यांनी मत मागायला आल्यास अपमान केला जाईल अशा आशयाचे बॅनर लावले आहे. यादव यांच्या घरात पाच मते आहेत. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच बारामती तालुक्यात देखील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. यात बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव राजकीय दृष्ट्या नेहमी चर्चेत असते. ते आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. वाघळवाडीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बॅनर लागले आहे. त्याची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. या गावातील एका नागरिकाने आपल्या घराबाहेर बॅनर लावले आहे. त्याची चर्चा आता रंगू लागली आहे.वाघळवाडी येथील सुरेश यादव यांनी हा बॅनर लावला आहे. यावर समाजकंटक, भ्रष्टाचारी, भ्रष्टाचाराला अभय देण्याकरिता मत मागणी करता येणाऱ्या उमेदवाराचा अपमान करण्यात येईल, या आशयाचा बॅनर लावण्यात आला आहे. त्याची आता राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र