शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

पुण्याची डिजीटल शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण होईल : मुक्ता टिळक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 21:53 IST

नागरी सहभागामुळे ख-या अर्थाने पुणे शहर डिजिटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजिटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे.

ठळक मुद्दे महापालिकेच्या सिटी डिजीटल स्ट्रॅटेजीचा शुभारंभस्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजविषयक सर्वेक्षणात पुणे महानगरपालिका देशात अव्वल

पुणे: गेल्या वर्षभरापासून महापालिकेने आॅनलाईन सेवाची प्रभावी अंमलबजावणी केली असून पुणेकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पुणेकरांना अधिकाधिक सुविधा आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देणे व प्रशासकीय कामात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी एंटरप्राईज जीआयएस, ई-लर्निंग प्रकल्प, सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी, पीएमसी केअर २.० या सुविधा पुणेकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे येत्या काही वर्षांत पुण्याची डिजिटल शहर म्हणून जगाच्या नकाशावर ओळख निर्माण होईल , असे मत महापौर मुक्त टिळक यांनी येथे व्यक्त केले.महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते शुक्रवारी बालगंधर्व येथे एंटरप्राईज जीआयएस, ई-लर्निंग प्रकल्प,सिटी डिजीटल स्ट्रॅटेजी,पीएमसी केअर २.० या योजनांचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना टिळक  म्हणाल्या,नागरिकांना सेवा-सुविधा देत असतानाच प्रशासनात नागरिकांचा सहभाग वाढणार आहे. मिळकत कर, जन्म-मृत्यू दाखले, मनपाच्या विकासकामांची माहिती आदी सुविधा आॅनलाईन माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचणार आहेत. या प्रकल्पांमुळे रस्ते दुरुस्ती, नळ कनेक्शन जोडणी,सेवा वाहिन्या याबाबत वेळेत माहिती प्राप्त झाल्याने प्रशासन व नागरिकांना लाभ होणार आहे. नागरी सहभागामुळे ख-या अर्थाने पुणे शहर डिजिटल शहर होवून जगाच्या नकाशावर ठसा उमटवेल. डिजिटल क्षेत्रात अशा प्रकारचे कार्य करणारी पुणे महानगरपालिका एकमेव ठरलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजविषयक अलिकडेच देशभर झालेल्या सर्वेक्षणाअंतर्गत पाहणी केल्यानंतर पुणे महानगरपालिका देशात अव्वल ठरलेली आहे.याच सर्वेक्षणात पालिका कामकाजाशी नागरिक कसे जोडलेले आहेत त्याबाबत नमूद केलेले आहे. नागरी सेवा सुविधांबाबत प्राप्त झालेल्या ९३,००० तक्रारींपैकी सुमारे ९२,५०० म्हणजेच जवळपास ९८% तक्रारींचे निवारण करण्यात आले. बहुतांश घरात स्मार्ट फोनसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे आॅनलाईन, डिजिटल सुविधांद्वारे नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. शुक्रवारी सुरू होत असलेल्या डिजिटल सेवांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. जीआयएस प्रकल्पाचा वापर, पाणी कनेक्शन जोडणी, डीबीटी, ई-लर्निंग, सिटी डिजिटल स्ट्रॅटेजी, पीएमसी केअर याबाबतही त्यांनी याप्रसंगी सविस्तर माहिती दिली. यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, दिलीप वेडेपाटील, गायत्री खडके उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळकdigitalडिजिटलkunal kumarकुणाल कुमार