राहुल चातुर यांना आयडियल शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:11+5:302021-09-06T04:14:11+5:30

शिक्षक दिनानिमित्त कलासाधना सामाजिक संस्थेमार्फत आयोजित नवी मुंबई येथील दिमाखदार समारंभामध्ये मुख्याध्यापक राहुल चातुर यांना शैक्षणिक व सामाजिक ...

Ideal Teacher Award to Rahul Chatur | राहुल चातुर यांना आयडियल शिक्षक पुरस्कार

राहुल चातुर यांना आयडियल शिक्षक पुरस्कार

शिक्षक दिनानिमित्त कलासाधना सामाजिक संस्थेमार्फत आयोजित नवी मुंबई येथील दिमाखदार समारंभामध्ये मुख्याध्यापक राहुल चातुर यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल हा पुरस्कार शिक्षक आमदार बाळाराम पाटील, सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक एस.बी. माळी, वरिष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

कोरोना संकटामुळे राज्यभरातील शाळा बंद आहेत; परंतु पिंपरी दुमाला शाळेचे मुख्याध्यापक राहुल चातुर व सहशिक्षक कांताराम शिंदे यांनी ‘शिक्षणाची गाडी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत नेऊन शिक्षण प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवली आहे. मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविण्याचे काम या उपक्रमामुळे साध्य झाले आहे. मुख्याध्यापक राहुल चातुर हे रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीण, मायेची ऊब फाउंडेशन, पुणे जिल्हा पदवीधर शिक्षक सभा आदी संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतात.

०५ रांजणगाव गणपती पुरस्कार

मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मुख्याध्यापक राहुल चातुर.

050921\img-20210905-wa0282.jpg

आयडियल शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना मुख्याध्यापक राहुल चातुर

Web Title: Ideal Teacher Award to Rahul Chatur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.