आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

By Admin | Updated: November 28, 2014 01:08 IST2014-11-28T01:08:33+5:302014-11-28T01:08:33+5:30

रोटरी क्लब ऑफ पुणो कात्रजतर्फे आदर्श गणोश मंडळ स्पर्धा, रोटरी समाज परिवर्तन व रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले.

The ideal teacher award is provided | आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

पुणो : रोटरी क्लब ऑफ पुणो कात्रजतर्फे आदर्श गणोश मंडळ स्पर्धा, रोटरी समाज परिवर्तन व रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राजीव गांधी ई-लर्निगच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणो जनसेवा फाउंडेशनचे चेअरमन डॉ. विनोद शहा होते. 
रोटरी समाज परिवार पुरस्कार प्रिझम फाउंडेशनच्या संचालिका हर्षा मुळे व जनसेवा वृद्धाश्रमाच्या प्रमुख दुर्गाताई लिंगडे यांना देण्यात आला. रोटरी आदर्श गणोश मंडळ पुरस्कारांचे पहिले पारितोषिक अरण्येशवर मित्र मंडळ, गवळीवाडा, दुसरे पारितोषिक अखिल चैतन्यनगर मित्र मंडळ व तिसरे पारितोषिक अष्टविनायक मित्र मंडळ, धनकवडी यांना मिळाले. उत्तेजनार्थ पुरस्कार वनराई कॉलनी मित्र मंडळ व जयनाथ तरुण मंडळ यांना देण्यात आला. 
शैक्षणिक क्षेत्रत उल्लेखनीय कार्य करणा:या शिक्षकांना रोटरी नॅशनल बिल्डर पुरस्कार देण्यात आला. त्यांत श्रीकांत चौगुले, शेलार, भागवत यांचा समावेश आहे.  विवेक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रोटरीची माहिती अनंत तिकोने यांनी दिली. या वेळी मनीषा तिकोने, अतुल दुव्रे, वैशाली लुपणो, नरेंद्र संचेती, मिलिंद कुलकर्णी, राम कुतवळ आदी उपस्थित होते. सुवर्णा कुतवळ यांनी आभार मानले.  (प्रतिनिधी)
 
4सोसायटी विभागातील आदर्श गणोश मंडळातील विजेते - प्रथम - ऋतुराज सोसायटी, मार्केट यार्ड, द्वीतीय - विनकर सोसायटी, धनकवडी, तृतीय - सावंत विहार, कात्रज व उत्तेजनार्थ गगन गॅलेक्सी सोसायटी व लेकटाऊन सोसायटी यांना मिळाला. शाळा, क्लासेस विभागात श्री क्लासेस यांना प्रथम पारितोषिक मिळाले. 
4रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते 2क्14 चे विजेते - बाळासाहेब भोईटे, भीमराव अडसूळ, सुदाम कुंभार, वासंती दीक्षित, ज्योत्स्ना गुरव, कीर्ती पंडित, चारुशीला वंजारे, महारुख शेख, कल्पना जाधव.

 

Web Title: The ideal teacher award is provided