शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात वैचारिक निरक्षरता : प्रा. तेज निवळीकर; साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 12:42 IST

महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते.

ठळक मुद्दे‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा व्याख्यानाचा विषयगाडगेबाबांना केवळ परिसराची नव्हे, समाजमनाची स्वच्छता करायची होती : तेज निवळीकर

पुणे : समाजात सामाजिक न्याय असतो. समूहात तो नसतो. आपण समूहात राहतो की समाजात याची जाणीव अद्याप लोकांना नाही. महाराष्ट्रात अजूनही वैचारिक निरक्षरता आहे, असे मत प्रा. तेज निवळीकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत श्री. म. माटे स्मृतिव्याख्यान गुंफताना ते बोलत होते. ‘उपेक्षित समाज आणि गाडगेबाबांचे विचार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते. प्रा. निवळीकर म्हणाले, ‘गाडगेबाबा हे कर्ते सुधारक होते. विचार, निर्णय आणि कृती या त्रिसूत्रीत त्यांचे आयुष्य बांधले गेले होते, त्यांनी कीर्तनातून जाणीव जागृती केली. बौद्धिक हुकूमशाही जास्त घातक आहे, याची जाणीव असणाऱ्या गाडगेबाबांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे विचार परखड असूनही, त्यांना विरोध झाला नाही. कारण त्यांच्या आचार उच्चार आणि विचारात एकवाक्यता होती. गाडगेबाबांना केवळ परिसराची स्वच्छता अपेक्षित नव्हती, त्यांना समाजमनाची वैचारिक स्वछता करायची होती. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. 

उपेक्षितांविषयी वाटणारी कणव हा माटे आणि गाडगेबाबांना जोडणारा समान धागा आहे. श्री. म. माटे हे थोर समाजशिक्षक होते. त्यांचे लेखन आणि जीवन यात भेद नव्हता. त्यांच्या विदवत्तेला कृतीची जोड होती आपल्या हयातीतली २० वर्षे त्यांनी दलित बांधवांच्या शिक्षणासाठी वेचली. अस्पृश्यता निवारणासाठी त्यांनी आपले सामर्थ्य पणाला लावले माटे यांच्या कार्याचे विस्मरण आजच्या समाजाला झाले आहे. - प्रा. मिलिंद जोशी 

टॅग्स :literatureसाहित्यPuneपुणे