निरक्षरता निर्मूलनासाठी आता ‘टीच’ उपक्रम

By Admin | Published: October 31, 2016 04:01 AM2016-10-31T04:01:25+5:302016-10-31T04:01:25+5:30

रोटरीने ‘इंडिया लिटरसी मिशन’च्या अंतर्गत ‘टीच’ प्रोग्राम हाती घेऊन निरक्षरता निर्मूलनाचे काम सुरू केले

Now the 'Teach' initiative to eradicate illiteracy | निरक्षरता निर्मूलनासाठी आता ‘टीच’ उपक्रम

निरक्षरता निर्मूलनासाठी आता ‘टीच’ उपक्रम

googlenewsNext


डोंबिवली : रोटरीने ‘इंडिया लिटरसी मिशन’च्या अंतर्गत ‘टीच’ प्रोग्राम हाती घेऊन निरक्षरता निर्मूलनाचे काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत शिक्षकांना सक्षम बनवणे, शिक्षकांचा तुटवडा असलेल्या शाळांमध्ये स्वयंसेवक नेमणे, उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना ‘नॅशन बिल्डर अ‍ॅवॉर्ड’ देऊन सन्मानित केले जाणार आहे.
राधिका गुप्ते या जिल्हापातळीवर शिक्षकांच्या सक्षमतेसाठी कार्यरत आहेत. त्या एक हजार ते दीड हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. टीच म्हणजे ‘टी’ म्हणजे टीचर, ‘ई’ म्हणजे ई-लर्निंग, ‘ए’ म्हणजे प्रौढ शिक्षण, ‘सी’ म्हणजे म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट, ‘एच’ म्हणजे हॅपी स्कूल, असे याचे विभाजन केले आहे.
मुलांच्या अकार्यक्षमतेविषयीची जागृती याअंतर्गत शिक्षकांना प्राथमिक शाळेतच मूल शिकत असतानाच गतिमंदत्व ओळखणे, निदान करणे व प्रतिबंध व उपचारासंबंधी माहितीची आवश्यकता निदर्शनास आली म्हणून ‘गतिमंदत्व’या विषयावर कार्यशाळा होणार आहे. त्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, राहटोळी, बदलापूर यांच्याद्वारे तालुकापातळीवर सर्व प्राथमिक शाळा शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई, अंबरनाथ, मुरबाड येथील ४६८ जिल्हा परिषद शाळा तसेच सर्व भाषिक ५१९ शाळांमधील शिक्षक या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. यासंदर्भातील पहिली कार्यशाळा राहटोळी येथे नुकतीच झाली. त्याला ४० विशेषतज्ज्ञ व साधन व्यक्तींची उपस्थिती होती. या कार्यशाळेला प्रशिक्षणार्थ्यांचा चांगला सहभाग होता. या वेळी गुप्ते लिखित ‘ओळख गतिमंदाची व कोशातील व्यक्तिमत्त्व’ ही पुस्तके सर्वांना उपयुक्त ठरली. चंद्रशेखर कोलवेकर यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्रक दिले. दुसरी कार्यशाळा दिवाळीनंतर होणार आहे. या उपक्रमात सातत्य राहणार असल्याचे राधिका गुप्ते म्हणाल्या.
>सामाजिक कार्यात सक्रिय
‘रोटरी इंटरनॅशनल’ने पोलिओ हा दुर्धर रोग हटवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. रोटरी सतत समाजातील कमतरता आणि गरज पाहून प्रयत्नशील आहे. या वेळी रोटरीयन प्रकाश बने, मनोज प्रधान, रमेश गुप्ते, राजीव प्रभुणे, ज्योती कुलकर्णी उपस्थित होते.

Web Title: Now the 'Teach' initiative to eradicate illiteracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.