संकटांवर मात करून आदर्श शेती

By Admin | Updated: September 5, 2015 03:22 IST2015-09-05T03:22:56+5:302015-09-05T03:22:56+5:30

स्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते.

Ideal farming by overcoming crises | संकटांवर मात करून आदर्श शेती

संकटांवर मात करून आदर्श शेती

शैलेश काटे, इंदापूर
स्वत:चे विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात असेल, तर डोंगराएवढी संकटे जमीनदोस्त करता येतात. त्याच जमिनीवर सोने उगवता येते. निमगाव केतकी जवळच्या राऊतवाडी येथील सिंधूबाई लक्ष्मण राऊत या ६४ वर्षे वयाच्या शेतकरी महिलेने हे दाखवून दिले आहे.
वयाच्या ३८व्या वर्षी विधात्याने माथ्यावर वैधव्याचा शाप लिहिला. पदरात एकुलता एक मुलगा, त्याचे शिक्षण, पालनपोषण व घर चालवण्याची जबाबदारी सिंधूबार्इंवर येऊन पडली. सोबत कर्तसवरतं कुणीच नव्हतं. होती तीन एकर जिरायती जमीन. ६३ फूट खोल कोरडी विहीर. मात्र न डगमगता, सिंधूबार्इंनी पडेल ते कष्ट करून मुलाचे शिक्षण पूर्ण केले. तो प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागला. सन २००४पासून गेल्या दोन वर्षांपर्यंत तीन वेळा रानात बोअर खोदल्या. पण एकदाही पाणी लागलं नाही. हिंमत न हारता, शिक्षक असणाऱ्या मुलाला शिक्षक पतसंस्थेतून साडेतीन लाख रुपये कर्ज काढावयास लावले. त्या रकमेतून रानातील बारा गुंठ्यांत ६० लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचे शेततळे तयार करून घेतले. शेजारच्या शेतकऱ्याच्या विहिरीतून ३०० रुपये प्रतितास प्रमाणे पाणी घेऊन शेततळे भरले. त्यावर ठिबक सिंचन संच जोडून घेतला.

शेळगाव परिसरामध्ये तेल्या रोगामुळे डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबेबहारमध्ये सुमारे ६० टक्के नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सप्टेंबरमध्ये आता हस्तबहार छाटणीला सुरुवात झाली आहे. येथील १० टक्के लोकांनी बागा काढून टाकल्या आहेत. तेल्याचे जिवाणू सुप्तावस्थेत दीर्घकाळ राहात असल्यामुळे योग्य वातावरणात त्याची वाढ होऊन अचानक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
- भजनदास पवार (डाळिंब उत्पादक, शेळगाव)

Web Title: Ideal farming by overcoming crises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.