शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पुणे महापालिकेच्या दळवी रुग्णालयातील आयसीयू कक्ष होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:24 IST

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून जुलै अखेरीस शहरात आयसीयू, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड कमी पडण्याची शक्यता

ठळक मुद्देनव्याने भरती केलेल्या मनुष्यबळाची नेमणूक : ससूनकडूनही मिळणार मनुष्यबळ क्रेडाईकडून देण्यात आलेले दहा व्हेंटिलेटर्स दोन महिन्यानंतर उपयोगात येणार

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या दळवी रुग्णालयात दोन ते तीन दिवसात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहे. पालिकेने नव्याने भरती केलेल्या तज्ञ मनुष्यबळासह ससूनकडून मिळणारे मनुष्यबळ येथे नेमण्यात येणार आहे. त्यामुळे क्रेडाईकडून देण्यात आलेले दहा व्हेंटिलेटर्स दोन महिन्यानंतर उपयोगात येणार आहेत. यासंदर्भात आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दळवी रुग्णालयात डॉक्टरांची बैठक घेतली.अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून तज्ञ मनुष्यबळासाठी पालिकेने ससून रुग्णालयाला पत्र दिले आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून जुलै अखेरीस शहरात आयसीयू, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड कमी पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या दळवी रुग्णालयात लवकरच आयसीयू कक्ष सुरू केला जाणार आहे.

क्रेडाई पुणे मेट्रो या संस्थेने महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग कार्यान्वीत करण्यासाठी १ कोटीचा निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला होता. या अतिदक्षता विभागात १० बेड, व्हेंटिलेटर, डिफिलेटर, सक्शन मशीन, इसीजी मशीन इत्यादी अशा ४० अद्ययावत उपकरणांचा समावेश असून सध्याच्या काळात कोविड १९ शी लढणाऱ्या रुग्णांना यामुळे अद्ययावत सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहेत.या तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावर प्रसूतिगृह आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर विलगिकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पालिकेला आवश्यकता असलेल्या चेस्ट फिजिशियन, फिजिशियन, भुलतज्ञ, इंटेसिव्हीस्ट, आयसीयू परिचारिकांची आवश्यकता आहे. पालिकेने नुकतीच डॉक्टर्स आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती केली आहे. यातील काही जणांना दळवी रुग्णालयात नेमण्यात आले आहे. नेमण्यात आलेल्यांमध्ये चेस्ट फिजिशियन, फिजिशियन, भुलतज्ञ, इंटेसिव्हीस्ट, आयसीयू परिचारिका यांचा समावेश आहे.---------या सुविधा मिळणारअतिदक्षता विभाग (आयसीयू) बेड - १०स्टेप अप बेड्स (आयसीयूमधून बाहेर काढल्यावर) - ०६ऑक्सिजन बेड्स - २०आयसोलेश बेड्स - ४८---------अशी झाली मनुष्यबळाची नेमणूकबीएएमएस डॉक्टर - ०६नर्स - २०वैद्यकीय कर्मचारी - २०सुरक्षा रक्षक - १०   ---------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या