‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’चे उद्या प्रकाशन
By Admin | Updated: August 21, 2015 02:32 IST2015-08-21T02:32:44+5:302015-08-21T02:32:44+5:30
पिंपरी-चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या

‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’चे उद्या प्रकाशन
प णे : पिंपरी-चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स आॅफ पीसीएमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात होणार आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, टॉपवर्थ ग्रुप आॅफ कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभय लोढा या
वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, यशदा रिअॅलिटी ग्रुपचे वसंत काटे या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत मीडिया लिमिटेड’चे चेअरमन, खासदार विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा आढावा या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये घेण्यात
आला आहे. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘जे. डब्ल्यू. मॅरीएट’, सेनापती बापट रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच आहे. आयबीएन-लोकमत कार्यक्रमाचा टीव्ही पार्टनर आहे.(प्रतिनिधी)