शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’ :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे १ मेपासून अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:42 IST

कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.

ठळक मुद्देराज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार, धर्मा पाटील यांच्या गावापासून सुरूवात

पुणे: कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतक-यांचे आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. मात्र,शेतक-यांनी आत्महत्येचा विचार करू नये, यासाठी येत्या १ मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’या अभियानाला सुरूवात करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस देहू येथे पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील माजी खासदार सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला असून रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.  शेट्टी म्हणाले,मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील गावापासून अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार असून ९ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियामाची सांगता होईल. गावोगावी जाऊन शेतक-यांना विश्वासात घेतले जाईल.कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतक-यांनी आत्महत्या करून नये,असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.  खासगी सावकारासह शेतक-याचे सर्व कर्ज एक रक्कमी माफ करून शेतक-यांचा सात-बारा कोरा करावा. तसेच शेतक-याला दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी दोन विधेयके स्वत: संसदेत सादर करणार आहे. त्यास देशातील ३२ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे येत्या १ मे रोजी होणा-या गाव सभेत या विधेयकांना पाठिंबा देण्याचे ठराव केले जाणार आहेत. हे ठराव लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीना पाठविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे येत्या १० मे रोजी १८५७ बंडाला १६१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किसान सभेतर्फे राबविल्या जाणा-या अभियानाचा भाग म्हणून हजारो शेतक-यांच्या स्वाक्ष-या घेतल्या जातील. तसेच या स्वाक्ष-यांसह लोकसभेत शेतकरी कर्जमाफी व हमीभाव विषयक मांडल्या जाणा-या विधेयकास मंजूरी मिळावी,यासाठी दबाव टाकणार आहे.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या