शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

...तोपर्यंत काम करतच राहीन! - अमिताभ बच्चन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 21:33 IST

Amitabh Bachchan : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देभारतीय चित्रपटसृष्टीमधील गेल्या पन्नास वर्षातील कारकिर्द उलगडताना अमिताभ बच्चन काहीसे भावूक झाले होते.

पुणे : आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले. पण, त्यातूनच शिकत गेलो. स्वतःमध्ये सुधारणा करत राहिलो. आजही नवीन चित्रपट किंवा प्रोजेक्ट्सवर काम करताना ते यशस्वी होतील की नाही याची चिंता असतेच. पण कुणी काही बोलले तरी कायम कामावरच लक्ष्य केंद्रित केले. वयानुरूप मला आजही काम मिळत आहे. जेव्हा काम मिळणे बंद होईल, तेव्हाचं थांबेन. जोपर्यंत काम मिळत राहील आणि रसिक थांबा म्हणणार नाहीत तोपर्यंत मी काम करतचं राहीन... हे प्रेरणादायी शब्द आहेत, भारतीय चित्रपटसृष्टीचा 'शहेनशहा'  ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचे. 

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ऑनलाइन पद्धतीने आयोजित सिंबायोसिस सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. भारतीय चित्रपटसृष्टीमधील गेल्या पन्नास वर्षातील कारकिर्द उलगडताना अमिताभ बच्चन काहीसे भावूक झाले होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. 

चित्रपटाच्या तीन तासाच्या कथेमधून विषयाला न्याय मिळतो. जो वास्तव जीवनात मिळवायला कदाचित वर्ष लोटतात. 'पिंक' चित्रपटातला 'नो' हा शब्द समाजात किती महत्वपूर्ण आहे. त्यामागची ताकद अनेकांना माहिती नव्हती. ती एका कथेतून कळली. 'ब्लॅक' चित्रपटातला  शिक्षक जेव्हा दिव्यांग विद्यार्थिनीला तू हे करू शकतेस याबाबत प्रोत्साहन देतो. तेव्हा त्या मुलीच्या आयुष्यात घडलेला बदल अनेकांना नि:शब्द करून जातो. कथेतून मांडलेले हे प्रभावी विषय खूप बदल घडवून जातात. कोणतीही प्रतिमा मग ती 'अँग्री यंग मॅन' ची का असेना समाजातून निर्माण होत असते. कारण त्यांना अन्यायाला वाचा फोडणारा असा कुणीतरी व्यक्ती हवा असतो आणि त्याला घडविण्यात दिग्दर्शकाचा वाटा अत्यंत महत्वपूर्ण असतो, असे ते म्हणाले. 

गेल्या काही वर्षांमध्ये माध्यमांची अनेक स्थित्यंतरे झाली. त्याकडे कसे पाहाता? याविषयी सांगताना प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ  आहे. आता पाचवे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा उल्लेख करावा लागेल. ज्यांनी आज आपल्या जीवनात महत्वपूर्ण स्थान  मिळवले आहे. मी देखील ब्लॉग, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, वर सक्रिय असतो..ही माझी एक फॅमिली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

अमिताभ बच्चन उवाच-  पाश्चात्य  आणि भारतीय संस्कृतीमध्ये शब्दांचे उच्चार वेगळे आहेत. शब्दांचे उच्चारण करताना आपली 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती  विसरता कामा नये. आपली भाषा आणि संस्कृती जिवंत ठेवणे आपले काम आहे. -  आयुष्यात काही गोष्टींमुळे दिवाळखोरीचा सामना करावा लागला. घरात पैसा नसला आणि कर्जाची रक्कम फेडू शकलो नाही तर जेलची हवा देखील खायला लागू शकते हे सर्व जवळून अनुभवले. त्यामुळे कुटुंबप्रमुख या नात्याने आजही काम करीत आहे. -  कलाकारांना सामान्य माणसाच्या आयुष्याशी काही देणेघेणे नसते हा समज चुकीचा आहे.भारतीय चित्रपट क्षेत्रातील बहुतांश कलाकार आपापल्याने परीने सामाजिक बांधिलकी जपतात. मात्र त्याची फारशी चर्चा करत नाहीत.  - कोव्हिडं काळात डॉकटर नर्स यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेले काम,  त्याग प्रशंसनीय आहे. देवळात देव शोधू नका..तो अनुभवायचा असेल तर रुग्णालयात जा तिथे डॉकटर आणि नर्सेसच्या रुपात खरे देवदूत मिळतील. - नैराश्यात असलेल्या लोकांशी बोलले पाहिजे...संवादाने खूप गोष्टी साध्य होऊ शकतात. चर्चा आणि संवाद साधला नाही तर उत्तर मिळू शकणार नाहीत.  

टॅग्स :Amitabh Bachchanअमिताभ बच्चनPuneपुणेsymbiosisसिंबायोसिस