शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

"कसब्यात गुलाल मी उधळणार, २५-३० हजारांच्या मताधिक्यांनी निवडून येणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:32 IST

विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती उमेदवार हेमंत रासनेंनी दिली.

पुणे - कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. त्यात भाजपा-शिवसेना आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यात २ पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या सर्व्हेतून भाजपाला कसब्यात धक्का बसेल असं सांगितले जात आहे. मात्र आपला विजय होणार असा विश्वास कसबा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे. 

हेमंत रासने म्हणाले की, गेली १५-२० दिवस निवडणुकीचा जो प्रचार झाला. शिवसेना-आरपीआय-भाजपाची यंत्रणा कार्यरत होती. आम्ही शेवटच्या माणसांपर्यंत पोहचलो. केंद्र आणि राज्य सरकार विकासकामे हे पाहता जनतेचा आशीर्वाद मला १०० टक्के मिळाला आहे. चांगल्या मताधिक्यांनी माझा विजय होईल. साधारण २५-३० हजारांचे मताधिक्य असू शकते. आम्ही बूथपासून काम केले आहे. कुठे किती मतदान झाले. पारंपारिक मतदारांना बाहेर आणण्यात कार्यकर्ते यशस्वी झालेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच विजयाचे बॅनर लागल्याने खूप कार्यकर्त्यांचे फोन आले. जेव्हा अधिकृत निकाल येईल त्यानंतर बॅनर लावायला हवेत. २ तारखेला लागलेला निकालाचे बॅनर पुढे कायम राहील. खूप जणांनी बॅनरबाजी केलीय त्यांचे काय झाले हे माहिती आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही बॅनर लावू नका अशा सूचना दिल्या आहेत. निकालानंतर बॅनर लागले तर ते लोकशाहीला धरून होईल. उद्या दुपारी २ वाजेपर्यंत माझ्या अंगावर गुलाल लागलेला असेल असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला. 

Exit Poll आले! कसब्यात भाजपाला धक्का बसण्याचा अंदाजपुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे. स्ट्रेलिमा संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, कसब्यात भाजपला धक्का बसू शकेल. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून, काँग्रेसचे रविंद्र धनगेकर हे सुमारे १५,०७७ मताधिक्यांनी विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कसबा पेठ येथे हेमंत रासने यांना सुमारे ५९,३५१ मते तर, रवींद्र धंगेकर यांना सुमारे ७४,४२८ मते पडू शकतात, असे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीkasba-peth-acकसबा पेठ