शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

फिल्म इंडस्ट्रीतल्या गटबाजीचा मला फटका ; अभिनेत्रीने घेतली "या" गटांची नावे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 23:40 IST

मी कुठल्या ग्रुपचा भाग नसूनही फिल्म इंडस्ट्रीमधल्या राजकारणाचा मला फटका बसला आहे आणि अजूनही बसत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.  

पुणे :  सगळ्या क्षेत्राप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीतही राजकारण आहे. आपल्याकडे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असून, आपले विचार मांडू दिले जात नाहीत, असे मत अभिनेत्री श्रृती मराठे यांनी व्यक्त केले. मी कुठल्या ग्रुपचा भाग नसूनही फिल्म इंडस्ट्रीमधल्या राजकारणाचा मला फटका बसला आहे आणि अजूनही बसत असल्याची कबुलीही त्यांनी दिली.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या ‘सांस्कृतिक कटटा’ अंतर्गत आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात श्रृती मराठे यांनी अभिनय क्षेत्रातील प्रवास आणि या क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.त्या म्हणाल्या की, 'मी कुठल्याही ग्रुपचा पार्ट नाही मराठी चित्रपट सृष्टीत महेश मांजरेकर,रवी जाधव,अमेय खोपकर यांचे ग्रुप आहेत.यांच्या कुठल्याच  ग्रुपमध्ये नाही मी नाही..मला याचा अगोदर त्रास व्हायचा. पण आता ते नाही त्याचं बरं वाटतंय असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत.  वेब सिरीजविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, वेब सिरीजमध्ये अभिनयाला वाव आहे. वेब सिरीज या नव्या माध्यमात प्रत्येकाला काम करावेसे वाटते. जिथे दिसण्यापेक्षा तुमच्या अभिनयाकडे सगळ्यांचे लक्ष असते. कलाकारांना वेब सिरीजमुळे एक चांगला प्लॅटफार्म उपलब्ध झाला आहे. वेब सिरीजमध्ये तुमच्या अभिनयाला वाव असतो.त्या पुढे म्हणाल्या, हल्ली नाटक ज्या पद्धतीने पोचायला हवे त्या पद्धतीने पोचत नाही. संहिता आणि निर्मिती चांगली असूनही, प्रेक्षक त्याकडे वळत नाहीत हे वास्तव आहे. काही वेळेला कमी प्रयोग करून त्या नाटकांचे प्रयोग थांबवावे लागतात. संगीत नाटकांबद्दल मला अद्याप कोणी विचारले नाही. मला मालिका, नाटक, वेब सिरीज आणि चित्रतट या तिन्ही माध्यमात काम करायला आवडते. सध्या कलाकारांना सोशल मीडियामध्ये ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण, मी जास्त ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Shruti Maratheश्रुती मराठेMahesh Manjrekarमहेश मांजरेकर Ravi Jadhavरवी जाधव