शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुरावेच लागणार नाहीत, पण योग्यवेळी पहाटेच्या शपथविधीचे पूर्णसत्य सांगेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 07:03 IST

देवेंद्र फडणवीस : मी जे सांगितले ते सगळे सत्यच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पहाटेच्या शपथविधीबाबत अर्धेच सांगितले. वेळ आली की शिल्लक आहे तेही सांगेन, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जे सांगितले ते सत्यच आहे, असा दावाही त्यांनी केला. पहाटेचा तो शपथविधी शरद पवार यांची संमती घेऊन केला होता, या फडणवीस यांच्या दाव्यावर राज्यात उलटसुलट चर्चा सुरू असतानाच फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात त्याचा पुनरुच्चार तर केला.

फडणवीस यांनी भाजपचे खासदार गिरीश बापट यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ते म्हणाले, त्यावेळी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरीही अभिमन्यूकडून आपण बरेच शिकलो आहोत. त्यातूनच आम्ही तो चक्रव्यूह भेदला आणि एकनाथ शिंदे आणि आम्ही सरकार स्थापन केले असे फडणवीस म्हणाले. 

अमित शाह यांचा दिला दाखला.....अमित शाह यांनी सांगितले आहे की, विरोधकांनी कितीही खोटे नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा मोदींवर विश्वास आहे. सन २००२ पासून मोदींना टार्गेट केले जात आहे. कधी नेत्यांच्या माध्यमातून तर कधी माध्यम समूहाचा वापर करून पण मोदी त्यातून सहीसलामत बाहेर पडले आहेत. अमित शाह त्यांच्या काही कार्यक्रमांसाठी म्हणून पुण्यात येत आहेत, निवडणूक प्रचारासाठी नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाहीत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाहीत. ते त्यांच्या रक्तात नाही. जे घडलं आहे तेच फडणवीस बोलत असतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही म्हटले आहे.

...तर पुरावेच लागणार नाहीतमी बोललो ते सत्यच आहे. तुम्हीच मी काय म्हणालो ते नीट ऐका. त्यावेळच्या माझ्या पत्रकार परिषदा ऐका. म्हणजे मग तुम्हाला एक-एक कडी जोडता येईल. असे केले तर मी बोललो त्या गोष्टीसाठी दुसऱ्या कोणत्याही पुराव्याची गरजच भासणार नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

फडणवीस यांनी सस्पेन्सही कायम ठेवल्याने राज्यातील राजकारणात आणखी नवनव्या चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेAjit Pawarअजित पवार