शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:17 IST

बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन सुनील तटकरेंनी केले,

Sunil Tatkare on Baramati byelection 2026: महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विरोधकांना सुनावत सुनेत्रा पवार यांचा विजय अजित पवार यांना श्रद्धांजली असेल असं आवाहन केलं.

मेळाव्याला संबोधित करताना सुनील तटकरे  भावूक झाले होते. "माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वाधिक काळ मी अजितदादांसोबत घालवला आहे. सर्वच पक्षांना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन केलं आहे. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्या मनात नसेल तरी आपण प्रयत्न करुया. अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सर्वांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अजित दादांना भावपूर्ण शद्धांजली अर्पण करणे म्हणजे सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर निवडून देणे या भावनेतून सगळ्या राजकीय पक्षांनी विनंती आहे. निवडणूक लादली गेली तर बारामतीकरांना विनंती आहे की, देशाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय झाला नसेल तितक्या विक्रमी मतांनी सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत," असे सुनील तटकरे यांनी म्हटलं. 

"ही निवडणूक बिनविरोध व्हावी. जर निवडणूक बिनविरोध होणार नसेल तर शप्पथ सांगतो की, बाबासाहेबांनी लोकशाहीची व्यवस्था या देशाला दिली आहे. आजपर्यंत देशात कुठल्याही विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी जो कोणी उमेदवार विजयी झाला असेल त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मतांनी सुनेत्रा वहिनींना निवडून आणायचं असा संकल्प करुया आणि हीच अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल, असेही सुनील तटकरे म्हणाले. 

तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना व्यासपीठावरून एक विशेष विनंती केली. " सुनेत्रा वहिनी, तुम्ही आज फक्त उमेदवारी अर्ज भरा आणि थेट प्रचाराच्या शेवटच्या सभेलाच या, असे सुनील तटकरेंनी म्हटलं. अजित पवार ज्या पद्धतीने शेवटच्या सभेला येऊन बारामतीकरांशी संवाद साधायचे, तीच परंपरा कायम ठेवण्याची विनंती तटकरेंनी केली.

बिनविरोधचे प्रयत्न फोल

बारामतीची परंपरा राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतः उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी संपर्क साधून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. मात्र, काँग्रेसने दिल्लीतून अ‍ॅड. आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्याने आता बारामतीत राजकीय सामना रंगणार हे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत या जागेसाठी १९ हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात बारामतीकर अजित पवारांप्रमाणे सुनेत्रा पवारांनाही पाठिंबा देतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tatkare vows victory for Sunetra Pawar in Baramati by-election.

Web Summary : Sunil Tatkare urges unanimous support for Sunetra Pawar's candidacy as a tribute to Ajit Pawar. If election is forced, he implores Baramati voters to ensure a record-breaking victory, surpassing any previous margin.
टॅग्स :baramati-acबारामतीAjit Pawarअजित पवारsunil tatkareसुनील तटकरेSunetra Pawarसुनेत्रा पवार