शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात मला विठ्ठल दिसतो.. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:23 IST

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंढरपूरपर्यत वारीला जात येत नव्हते.

वडकी: आई-वडील दरवर्षी पंढरीची वारी करत असत..मात्र, आठ वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाले. खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना वाचवू शकलो नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पंढरपूरपर्यत वारीला जात येत नव्हते. पंढरीची वारी शक्य नाहीतर वारकऱ्यांच्या सेवेतून विठ्ठलाची भक्ती साधावी असा विचार करत त्यांनी पालखी मार्गावर मोफत चहा वाटण्याची सेवा सुरू केली आहे. सुरुवातीला एक हजार चहाचे वाटप केले होते. आता सातव्या वर्षी सात हजार चहा वाटप करण्यात येत आहे. निस्वार्थ सेवा केली की प्रगती नक्की होते, असे सुनील विठ्ठल गोयकर हे माऊलींचे सेवेकरी सांगत होते.   वारी म्हटलं की प्रत्येकाचे तिच्याशी काही ना काही निमित्त नक्कीच जोडलेले असते. प्रपंचाच्या वाटेने अलवार वारीच्या माध्यमातून परमार्थाकडे नेणारे साधन म्हणजे वारी.. याच वारीत वडकी येथे गवसला असा एक तरुण ज्याला वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यात विठ्ठल दिसतो.. वारकऱ्यांची सेवा करावी म्हणजे वडिलांची सेवा करण्याचे भाग्य मिळेल असा भोळा भाव त्याच्या मनात आला. याच भावनेतून ते २०१३ पासून हडपसर सासवड रोडवरील वडकी या गावात ते गेल्या सहा वर्षांपासून स्वर्गीय विठ्ठल चंद्रकांत गोयकर या नावाने चहाचा स्टॉल लावत आहे.  या सेवेत त्याला सापडतो विठ्ठल म्हणजे भगवंत आणि त्यांचे वडील सुध्दा.. काय आहे सुनील यांचा अनुभव जाणून घेऊ या.. सुनील म्हणाले,  पहिल्या वर्षी वारीत एक हजार कप चहा वाटप केले. प्रत्येकी पाच रुपये या प्रमाणे चहाचे पैसे पाच हजार रुपये देण्याएवढीही ऐपत नव्हती. मात्र वडिलांसाठी ही सेवा करायची एवढेच डोक्यात होते. कसेबसे पैसे फेडले. त्यांनंतर प्रवास सुरु झाला तो संघर्षाचा.. वर्षभर काम करून दुसऱ्या वर्षी दोन हजार कप चहा वाटप करण्याचे ठरवले. यावेळी मात्र पैसे फेडण्या इतपत परिस्थिती नक्कीच होती. त्यांनंतर दरवर्षी एक हजारांनी चहाचे कप वाढवायचे ठेवरले. या वर्षी सात हजार कप वाटप करतोय. पैसे फेडण्याची कोणती चिंता नाही. कारण आता खूप कष्ट करून बऱ्यापैकी पैसा कमावला आहे. म्हणून त्याची विठ्ठलावर भक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पालखी सुरू झाली की, आई वडील मोठ्या उत्साहाने पालखीला जात असे. मात्र वडील गेल्यानंतर पालखीला जाण्यासाठी त्याच्या आई सोबत आता वडील जाणार नव्हते. किमान पालखी मार्गावरतरी वडिलांचा फोटो लावावा असे त्याला वाटले. वारकऱ्यांची सेवा करावी म्हणजे वडिलांची सेवा करण्याचे भाग्य मिळेल असा भोळा भाव त्याच्या मनात आला. २०१३ पासून हडपसर सासवड रोडवरील वडकी या गावात तो गेल्या सहा वर्षांपासून स्वर्गीय विठ्ठल चंद्रकांत गोयकर नावाने चहाचा स्टॉल लावत आहे. 

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरPandharpur Wariपंढरपूर वारी