शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

...त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी; पुण्यातील शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंची साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 21:45 IST

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली

पुणे : भारतीय जनता पार्टीला शिवसेना संपवायची आहे, त्यांचा डाव हाणून पाडण्यासाठी मला तुमची ताकद हवी आहे, हा प्रवास विनातिकीट करायचा आहे.  सोबत रहा अशा भावनिक शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दुपारी पुण्यातील शिवसैनिकांना साद घातली.

मातोश्री या निवासस्थानी ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांची भेट घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्यासह शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक विशाल धनवडे व अन्य माजी नगरसेवक, उपशहरप्रमुख रुपेश पवार, विजय देशमूख, अनंत गोयल तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते.

ठाकरे यांनी त्यांना सांगितले की, भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीच हे सगळे सुरू आहे. यापुढचा प्रवास विनातिकीट आहे. माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, मात्र ताकदीने माझ्यासमोर उभे रहा, आपण शिवसेना पुन्हा उभी करू, त्यांचा डाव हाणून पाडू. फुटून बाहेर पडलेल्या आमदारांनी हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हानही त्यांनी दिले. निलम गोऱ्हे यांनीही यावेळी शिवसैनिकांनी एकजुटीने व ताकदीने पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण