भावनेच्या भरात चूक झाली, बलात्काराचा गुन्हा दाखल करू नको, अन्यथा आत्महत्या करेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:10 IST2021-03-27T04:10:28+5:302021-03-27T04:10:28+5:30
पुणे : भावनेच्या भरात चूक झाली, तुझा आयुष्यभर पत्नी म्हणून सांभाळ करतो, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस. जर ...

भावनेच्या भरात चूक झाली, बलात्काराचा गुन्हा दाखल करू नको, अन्यथा आत्महत्या करेन
पुणे : भावनेच्या भरात चूक झाली, तुझा आयुष्यभर पत्नी म्हणून सांभाळ करतो, माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस. जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी देणा-या एका 40 वर्षीय व्यक्तीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात एका 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रामदास दत्तोबा थोरात (रा. आयुधिक कार्यशाळा शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून थोरात याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर भावनेच्या भरात माझी चूक झाली. या चुकीबद्दल तुला घर किंवा जागा घेऊन देतो. तसेच दर महिन्याला 10 हजार रुपये आणि निवृत्त झाल्यावर 5 हजार रुपये व निवृत्तीच्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम देतो. नोटरी करून देऊन पत्नी म्हणून सांभाळ करतो. पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू नकोस, असे थोरात याने महिलेला सांगितले. मात्र जर गुन्हा दाखल केलास तर तुझ्या कुटुंबाच्या नावाने चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन, अशी धमकी त्याने महिलेला दिली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झडते करीत आहेत.