शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध होण्यासाठी माझ्याकडे वेळच नाही: सदगुरू जग्गी वासुदेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 06:38 IST

ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.

पुणे :

‘जगभर भ्रमंतीचा निर्णय ईशा फाउंडेशनच्या टीमला माहीतही नव्हता. मी ३ जानेवारीला त्यांना माझी कल्पना सांगितली आणि वेळ कमी असला तरी ती प्रत्यक्षात आणण्याचा निग्रहही केला. मला सतत काम करीत राहायला आवडते. मी माझे आयुष्य मनापासून आणि भरभरून जगतो. वृद्ध होण्यासाठीही माझ्याकडे वेळ नाही’, अशा शब्दांत ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आपल्या निरामय जीवनाचा कानमंत्र सांगितला.

प्रदूषण रोखून माती संवर्धनाचा संदेश देण्यासाठी २६ देशांचा दाैरा करून ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू मंगळवारी पुण्यात आले होते. ‘लोकमत’च्या व्यासपीठावर त्यांनी पुण्यातील मान्यवरांशी संवाद साधला. या वेळी ‘माती वाचवा’चा (सेव्ह सॉईल) जागर करण्यात आला. व्यासपीठावर लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संजय चोरडिया, अतुल गोयल, जय श्रॉफ, अभय लोढा, आदी मान्यवर उपस्थित होते.  

सद्गुरू म्हणाले, ‘मानवी शरीरात ६० टक्के जीवजंतू आहेत. जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात आल्यास मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. आपण आहार, आरोग्य याबाबत चुकीच्या पद्धतीने विचार करीत असतो. आरोग्याची अतिरेकी काळजी हे आजारपणाचे लक्षण आहे. पोटाला अन्नाची भाषा कळते. कधी, काय आणि किती खावे, हे समजले पाहिजे. आजकाल कार्यक्रमांत जेवणामध्ये २०-२५ पदार्थ असतात. परंतु एकाच वेळी एवढे पदार्थ खाण्याऐवजी एखादाच पदार्थ खाणे योग्य.’  

‘शरीराला विश्रांती आवश्यक असते. मात्र, प्रत्येक वेळी झोप म्हणजे विश्रांती नव्हे, यावरही त्यांनी भाष्य केले. चैतन्य राठी यांनी सूत्रसंचालन केले.काय म्हणाले सद्गुरू? - तुम्ही चांगले खाल्लेच पाहिजे. मात्र, त्याचा अतिरेकही टाळायला हवा. प्रत्येकाच्या जीवनशैलीचा, शरीराचा पॅटर्न वेगवेगळा असतो. त्यानुसार बदल करायला हवेत.- मातीचा दर्जा घसरत असल्याने आपल्या अन्नाचा दर्जाही खालावत चालला आहे. अन्नातील ९० टक्के पोषक घटक कमी झाले आहेत. - फळे, भाज्या यांतील सूक्ष्म, पोषक घटकही गेल्या १०० वर्षांत कमी होत चालले आहेत. मातीचे संवर्धन न होणे हे यामागचे कारण आहे. - आपल्या शरीराचा समतोल जपायचा असेल तर जीवजंतूंचा समतोल आणि मातीचा दर्जाही सांभाळला गेला पाहिजे.- पृथ्वीवर अब्जावधी विषाणू आहेत. त्यातील केवळ १४ हजार आपल्यासाठी घातक आहेत. तरीही आपण आरोग्याची विनाकारण काळजी घेतो.- पारंपरिक अन्न खाणे शरीरासाठी फायद्याचे असते. त्यामुळे आरोग्याला फायदाच होतो. 

‘तुम्हाला पावभाजी, डोसा, इडली, चिली असे चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह होत नाही का?’ असे विचारले असता, ‘माझ्या हातचा मसाला डोसा खाल तर माझे गुलाम व्हाल,’ अशी मिश्कील टिप्पणीही सद्गुरू यांनी केली.

टॅग्स :Puneपुणे