शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मी शो बाजी करायला मुंबईला गेलेलो नाही : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 20:11 IST

येत्या सव्वातीन वर्षात पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असणार

इंदापूर: इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी काही शो बाजी करायला मुंबईला गेलेलो नाही. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना, बावीस गावांना हक्काचे पाणी कशा पद्धतीने मिळेल यासाठी प्रयत्न करत आहे. येत्या सव्वातीन वर्षात पुढच्या शंभर वर्षांचा विचार करून इंदापूर तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. 

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परिसरात शानिवारी (दि. ४) इंदापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. ते पुढे म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये गट-तट विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा गाजेल, याकडे लक्ष द्या. तसेच काही ढोंगी लोक येथील जाती-पातीचे राजकारण करतील, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. या लोकांचे पाठीमागील वीस वर्षांचे रिपोर्ट पाहिले पाहिजेत. मागच्या वीस वर्षात कुठे विकास होता. एखादा काम करणारा असेल तर भले त्याला उचलून घेऊ नका, मात्र उगीच काम करणाऱ्याच्या मार्गात काटे पेरायचे काम कुणीही करू नये. त्यामुळे काम करणाऱ्याला काय वेदना होतात ते तुम्हाला समजणार नाही. एखादी खोटी बातमी कुठे आली तर त्याच्या काय वेदना होतात ते तुम्हाला कळणार नाही. त्या वेदना समजुन घ्यायच्या असतील माझ्या बायकोला विचारा असेही राज्यमंत्री भरणे यावेळी म्हणाले. 

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन घोटकुल, स्वप्निल कोंडे-देशमुख, अ‍ॅड. शुभम निंबाळकर, बाळासाहेब ढवळे, सचिन खामगळ यांच्यासह राष्ट्रवादीचे इंदापूर पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. --------------------------भावकी-भावकी न करता गोरगरिब समाजाकडे लक्ष द्या... गाव भावकी विसरून गोरगरिब भटक्या समाजाकडे सुद्धा लक्ष द्या. त्यांच्या जास्त अपेक्षा नसतात. त्यांची नुसती विचारपुस केली एखादे काम केले तर विरोधकांनी लाख रूपये जरी समोर टाकले तरी तो आपल्याला विसरणार नाही. तुमच्या गावकी आणि भावकीची कामे खुप मोठी असतात. मात्र त्यांची कामे खुप छोटी आहेत. फक्त भावकी-भावकी न करता या गोरगरिब समाजाकडे देखील लक्ष द्या, अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. . 

टॅग्स :IndapurइंदापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार