शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...त्या रंग नसलेल्या भोंग्यातून मला राष्ट्रगीत ऐकू येईल; अमोल कोल्हेनी सांगितला एक किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:15 IST

पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईदमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

पुणे : पुण्यात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ईदमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षांपासून कोविडमुळे बंद असणारा हा कार्यक्रम यावर्षी राज्य कोविड निर्बंधमुक्त झाल्याने मोठ्या उत्साहात झाला. या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांसाठी शिरखूर्मा व स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, वंदना चव्हाण, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि पदाधिकारी उपस्थित होते. खासदार अमोल कोल्हे यांनी सध्या सुरु असलेल्या भोंग्यांच्या वादावरून एक किस्सा सांगितला आहे. 

कोल्हे म्हणाले, एका दुकानात ३ भोंगे लावले होते, एक हिरवा, एक भगवा आणि एक बिनरंगाचा होता. तिघांपैकी रंग नसलेल्या भोंग्याला हिरव्या आणि भगव्याने विचारलं, कि आता तुझं इथं काही काम नाही. आता सध्या आमचं मार्केट चालू आहे. त्यावेळी रंग नसलेल्या भोंगाने उत्तर दिले कि, मागील दोन वर्षात रुग्णवाहिकेसाठी माझाच वापर झाला आहे. त्यामधून अनेकांचे प्राण वाचले. पण दंगली घडल्या नाहीत. त्यानंतर एक विद्यार्थी भोंगा घेण्यासाठी दुकानात आला. दुकानदाराने त्याला कुठला भोंगा पाहिजे असं विचारले. विद्यार्थ्याने थेट रंग नसलेल्या भोंग्यांकडे बोट दाखवले. तेव्हा दुकानदराने 'तुला हा भोंगा का पाहिजे' असा प्रश्न विचारला. विद्यार्थ्याने अगदी सोप्या भाषेत उत्तर दिले कि, मला माझ्या वाढदिवसानिमित्त शाळेला हा रंग नसलेला भोंगा गिफ्ट द्यायचा आहे. या रंगाच्या भोंग्यातून हे ऐकू येणार असेल. त्या रंगाच्या भोंग्यातून ते ऐकू येणार असेल. तर मला रंग नसलेला भोंगा हवा ज्यातून आम्हा सर्व मुलांना राष्ट्रगीत ऐकू येईल असे त्याने सांगितले. कारण इतर दोन रंगांच्या भोंग्यांमधून येणारे आवाज शाळेसाठी महत्वाचे नाहीत. परंतु या रंग नसलेल्या भोंग्यांमधून वाजणारे राष्ट्रगीत मुलांना ऐकण्यास योग्य राहील असे मला वाटते. असा किस्सा त्यांनी कार्यक्रमात कोल्हे यांनी सांगितला आहे. 

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेSharad Pawarशरद पवारRamzan Eidरमजान ईदNCPराष्ट्रवादी काँग्रेस