शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: मी येरवड्याचा भाई आहे, आज तुला संपवतोच, म्हणत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, एकाला अटक

By नम्रता फडणीस | Updated: October 20, 2023 14:42 IST

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली...

पुणे : 'मी येरवड्याचा भाई आहे, तुला तर आज संपवूनच टाकतो असे सांगत चोवीस वर्षीय तरुणावर धारदार हत्याराने डोक्यावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. समीर मकरंद सावंत (वय 22 रा.सुभाषनगर येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी अमेय जगताप (वय 24 रा; सुभाषनगर नवी खडकी येरवडा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सावंतवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 18 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता नवी खडकी मधील नेताजी शाळेजवळील किराणा दुकानासमोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नेताजी शाळेजवळील किराणा दुकानात किराणा सामान आणण्यासाठी गेले असताना त्यांच्याच परिसरात राहाणा-या आरोपीने शिवीगाळ व धक्काबुक्की करुन  इथे थांबायचे नाही, मी बोलतो ना , तर ऐकायचे, फिर्यादी याने विचारणा केल्याचा राग मनात धरुन, तू मला उलटे बोलतो का, तुला माहिती नाही का मी येरवड्याचा भाई आहे. तुला तर आज संपवूनच टाकतो असे बोलून त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच त्याच्याकडील हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.

टॅग्स :Yerwadaयेरवडाyerwada policeयेरवडा पोलीसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी