शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘मी शनिवारवाडा बोलतोय’चा आवाज ‘म्यूट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:23 IST

‘मी शनिवारवाडा बोलतोय' हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो गेल्या महिन्याभरापासून बंद आहे.

ठळक मुद्देविद्युत दाब कमी- जास्त झाल्याने झालेल्या बिघाडामुळे सॉफ्टवेअर करप्ट ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीसह पालकांची निराशा

पुणे : ‘मी शनिवारवाडा बोलतोय' हा महापालिकेचा लाईट अँड साऊंड शो मागील महिन्याभरापासून बंद पडला असून विद्युत दाब कमी- जास्त झाल्याने झालेल्या बिघाडामुळे सॉफ्टवेअर करप्ट झाला आहे. हे सॉफ्टवेअर दुरुस्त करून पुन्हा नव्याने देण्यासाठी पालिकेला तीन लाख रुपये मोजावे लागले आहेत. नुकतेच विद्युत विभागाने हे पैसे संबंधीत सॉफ्टवेअर कंपनीला दिले आहेत. हा शो गेल्या महिन्याभरापासून बंद पडला असून ऐन उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनीसह पालकांची निराशा होत आहे. याशिवाय, महापालिकेच्या उत्पन्नालाही फटका बसतो आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेला शनिवारवाडा पाहण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पुण्याचा आणि शनिवारवाड्याचा इतिहास नागरिकांसह पर्यटकांना समजावा, तीन वर्षांपूवीर्पालिकेने ४ ते ५ कोटी रुपये खर्च करुन या ठिकाणी नवी साऊंड सिस्टीम आणि विद्युत यंत्रणा बसविली. तब्बल २२ कलाकारांच्या आवाजाचा समावेश ह्यलाईट अ‍ॅन्ड साऊंड' शोमध्ये करण्यात आला. येथील बैठक व्यवस्था आणि अन्य बाबींची दुरवस्था झाली आहे. त्यातच पालिकेच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे हा शो पुन्हा बंद पडला आहे. विद्युत दाब कमी-जास्त झाल्याने तांत्रिक बिघाड झाला. स्पीकर, मिक्सर आणि अन्य उपकरणांमध्ये हा बिघाड झाल्यामुळे हा शो महिन्याभरापासून बंद असल्याचे पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले. हा बिघाड दूर करून शो पुन्हा पूर्ववत व्हायला आणखी १५ दिवस लागतील, असे अधिका-यांचे म्हणणे आहे.सॉफ्टवेअर करप्ट झाल्याने पुन्हा नव्याने ते तयार करून घ्यावे लागणार असून त्यासाठी विद्युत विभागाने तीन लाळ रुपए संबंधीत विभागाला दिले आहेत. या दुरीस्तीसाठी आणखी खर्च येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेShaniwar WadaशनिवारवाडाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका