राज्यपालांचा मी लाडका मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:29 IST2021-02-20T04:29:06+5:302021-02-20T04:29:06+5:30

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सर्व विद्यापीठाचे कुलपती असल्याने आणि मी उच्च शिक्षण खाते असल्यामुळे माझी त्यांच्याशी वारंवार ...

I am the darling minister of the governor | राज्यपालांचा मी लाडका मंत्री

राज्यपालांचा मी लाडका मंत्री

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सर्व विद्यापीठाचे कुलपती असल्याने आणि मी उच्च शिक्षण खाते असल्यामुळे माझी त्यांच्याशी वारंवार चर्चा होते. मंत्री म्हणून त्यांचा लाडका असलो तरी राज्य शासन आणि त्यांच्यातील वाद सोडवण्याएवढा मी मोठा नेता नाही,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी सांगितले. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरून शिवसेनेत दोन गट पडले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उच्च शिक्षण विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात गेल्या काही कालावधीपासून संघर्ष सुरू आहे. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीवरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत सामंत यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले, राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात तसे कोणतेही वाद नाहीत. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार ते राज्य शासनाला काही पत्र लिहीत असतात आणि राज्य शासनही त्यांना पत्र लिहून उत्तर दते. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचा असून उच्च शिक्षण मंत्री म्हणून माझा राज्यपालांशी कायम संवाद होतो. राज्यपालांच्या मी लाडका मंत्री आहे. पण राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील वाद सोडविण्याइतका मी मोठा नाही, असे सामंत म्हणाले.

---

सेनेत दोन गट नाहीत

शिवसेना हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालणारा पक्ष असून त्यांचा आदेश शिवसैनिक किंवा मंत्र्याला मान्यच करावा लागतो. तसेच पूजा चव्हाण प्रकरणावरून शिवसेनेत कोणतेही गट नाहीत. मुख्यमंत्री जो आदेश देतात तो सर्वांना मान्यच असतो. तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांच्या पातळीवर माहिती घेत आहेत. उपमुख्यमंत्री यांनीही यावर वक्तव्य केले आहे. त्यामुळे आपल्या सहकार्याबद्दल भाष्य करणे योग्य ठरणारे नाही. राठोड हे स्वत:च समोर येऊन बोलतील, असेही सामंत यांनी सांगितले.

Web Title: I am the darling minister of the governor