शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“मीही अर्थमंत्री... बैठका, घेण्याचा मलाही अधिकार”; अजित पवार चांगलेच संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 05:52 IST

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे मुर्ख आहोत का,’ असा सवाल अजित पवारांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : अर्थमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार आहेच. पालकमंत्रिपदाचा कसलाही वाद नाही, पुण्यातील ध्वजवंदन राज्यपालच करत असतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींवरच संतापले. राज्य सरकारनेच पत्रक काढून पुण्याचे ध्वजवंदन पालकमंत्री चंद्रकात पाटील करणार, असे जाहीर केल्याचे सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

पुण्यातील विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, ते आता कोणाकडे आहेत कसे समजायचे, या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम स्थापन केली आहे. या वॉर रूममध्ये मुख्यमंत्री नसताना अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावरही मुख्यमंत्रिपदावर डोळा, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यानेही पवार यांनी संताप व्यक्त केला.   मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मुर्ख आहोत का,’ असा सवाल करीत ‘मुख्यमंत्र्यांत आणि माझ्यात कोणताही वाद नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

मीही अर्थमंत्री आहे. बैठका घेण्याचा, माहिती घेण्याचा अधिकार मलाही आहे. त्यामुळे मी बैठका घेतो. मात्र,  काही निर्णय वगैरे गोष्टी असतील तर मुख्यमंत्र्यांचाच शब्द अंतिम असतो. त्यामुळे ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे, यात तथ्य नाही असे ते म्हणाले.

ध्वजवंदनाच्या निर्णयावर संतापले

स्वातंत्र्य दिनी पुण्यात पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार, असे पत्रक सरकारकडून जाहीर केले होते. त्यामुळे पालकमंत्री पाटीलच अशा बातम्या आल्या होत्या. त्यावरही पवार यांनी संताप व्यक्त केला. मागील अनेक वर्षांची पुण्यात प्रथा आहे की, स्वातंत्र्य दिनाचे ध्वजवंदन राज्यपाल करतात. त्यामुळे पालकमंत्री कोण, असा प्रश्न आला कुठे, असा प्रश्न त्यांनी केला.  सरकारचेच तसे पत्रक होते, याकडे लक्ष वेधले असता त्यावर ते काहीच बोलले नाहीत.

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे