शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा लढवण्यास तयार; पोटनिवडणुकीवर रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 19:10 IST

कसबा मतदार संघाचे मतदार हे विकास करणाऱ्या, सुखसुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीकडे बघूनच मतदान करणार

पुणे : आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षे वर्चस्व असले तरीही पोटनिवडणुकीत काँग्रेसला संधी मिळाल्याचा इतिहास आहे. विरोधकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे हे इच्छुक आहेत. त्यावरून रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा कसबा लढवण्यास तयार आहे.असे  मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पाटील म्हणाल्या, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता येणाऱ्या काही दिवसात चित्र तुमच्यासमोर येईल. काँग्रेसने त्यांचे उमेदवार लढवणार असल्याचं सांगितलं आहे. तिन्ही पक्षाकडून उमेदवार इच्छुक आहेत. पण येणाऱ्या काळात तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढची प्रक्रिया करू. कसबा मतदार संघाचे मतदार हे विकास करणाऱ्या, सुखसुविधा पुरवणाऱ्या व्यक्तीकडे बघूनच मतदान करतात. पूर्वीपासून काँग्रेस लढवत होते म्हणून तेच लढवतील किंवा भाजप दरवेळी निवडून येतात. म्हणून यंदाही तेच निवडून येतील असं होणार नाही. येणाऱ्या काळात कळेल कि, उमेदावर कोण असणार आहे. कसबा निवडणूक बिनविरोध होणार नाही. पक्षाने आदेश दिल्यास मीसुद्धा ही पोटनिवडणूक लढण्यास तयार आहे. तस मी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. 

काय आहेत शक्यता? 

-- निवडणूक बिनविरोध- मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास सहानुभूती म्हणून महाविकास आघाडीसह अन्य राजकीय पक्ष उमेदवारच देणार नाहीत.

-- अन्यायाची भरपाई- मागील विधानसभा निवडणुकीत मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकात पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. सिटिंग आमदार असलेल्या प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली. त्या अन्यायाची भरपाई म्हणून यावेळी इथून उमेदवारी दिली जाऊ शकते.

- इच्छुकांना संधी- कोथरूड मतदारसंघातून भाजपमध्येच बरेच इच्छुक आहेत. खासदार व या मतदारसंघाचे माजी आमदार, पुण्यातील भाजपचे प्रमुख नेते गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे, माजी नगरसेवक अशोक येनपुरे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे.

-- विरोधकांचे इच्छुक - यात मागील वेळचे काँग्रेसचे उमेदवार, विद्यमान शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचेच सहयोगी सदस्य, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, शिवसेनेकडून विशाल धनवडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली पाटील-ठोंबरे यांचा समावेश आहे. 

कसबा मतदारसंघ (मतदार)

एकूण : २ लाख ७५ हजार ४२८

पुरुष : १ लाख ३६ हजार ८७३

महिला : १ लाख ३८ हजार ५५०

तृतीयपंथी : ५

टॅग्स :Puneपुणेkasba-peth-acकसबा पेठElectionनिवडणूकPoliticsराजकारणgirish bapatगिरीष बापटMukta Tilakमुक्ता टिळक