शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
4
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
5
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
6
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
7
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
8
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
9
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
10
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
11
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
12
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
14
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
15
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
16
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
17
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
18
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
19
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
20
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत

मी सैन्याच्या नव्हे, व्यवस्थेच्या विरोधात : शर्मिला इरोम यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 10:18 PM

सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो.

ठळक मुद्देकाश्मीरमधील महिलांसाठी काम करणार

 पुणे : ‘लोकशाहीतील सरकार लोकांचेच असले पाहिजे. मी राष्ट्रविरोधी कृत्याचे समर्थन कधीच करणार नाही. लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांच्या समस्यांचा बारकाईने विचार व्हायला हवा. सीमाभागात आस्फा कायद्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्यामुळे सीमेवरचा भाग भरडला जातो. मी सैन्याच्या नव्हे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे’, अशी स्पष्टोक्ती मणिपूर येथील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या शर्मिला इरोम यांनी दिली. काँग्रेस किंवा भाजपपेक्षाही मला लोकांचे सरकार आवडते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.     जगातील सर्वात जास्त काळ उपोषण केलेल्या मणिपूर राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि कवयित्री ‘आयर्न लेडी’ शर्मिला इरोम यांची प्रगट मुलाखत महावीर जैन विद्यालयात आयोजित करण्यात आली होती. युवराज शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शर्मिला यांचे पती दसमंड कुतिनाहो, प्रमुख पाहुणे म्हणून विद्या बाळ, असीम सरोदे, डॉ. योगेश वाठारकर, संजय शहा, सरहदचे संजय नहार उपस्थित होते. ‘सरहद’ तफे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.    शर्मिला इरोम म्हणाल्या, ‘आंदोलनाच्या काळात मला खूप नैराश्य येत होते. राजकारणात गेल्याने विश्वासार्हता कमी झाली, असे मला वाटत नाही. मी आजवर मोदींना भेटले नाही. मला सरहद संस्थेने सदिच्छा दूत नेमले असून काश्मीरमधील महिलांसाठी काम करणार आहे. मी काश्मीरच्या लोकांना प्रेम देऊ इच्छिते. एकीकडे काश्मीर सरकार तर दुसरीकडे पाकिस्तान अशा दोन्ही बाजूंनी काश्मीरमधील सर्वसामान्य भरडले जात आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मला खूप काम करायचे आहे. सरकार आणि लष्कर दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी अब्जावधी रुपये खर्च करतात. मात्र, सर्वसामान्यांचे हाल, शेतक-यांच्या आत्महत्या हे भीषण वास्तव स्वीकारुन त्यावर मार्ग काढायला सरकार पुढे येत नाही.’‘भारतीय समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा कृत्यांविरोधात कडक कारवाई होऊन सामान्यांना न्याय मिळणे अपेक्षित आहे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.विद्या बाळ म्हणाल्या, ‘सर्वसामान्य लोक कायमच व्यवस्थेचे बळी ठरतात. शर्मिलाने १६ वर्षे उपोषण करुनही निष्ठुर, निर्दयी सरकारला कसलाही फरक पडला नाही. उपोषण राहून मरण्यापेक्षा जिवंत राहून काम करणे गरजेचे आहे, हे पटल्याने तिने मानवी हक्कांसाठी लढा उभारला आहे. सध्या समाजाची अवस्था संवेदनाहीन झाली आहे. या समाजाविरोधात लढा उभारणारी इरोम ही जिद्दीचे प्रतीक आहे.’--------------------मोदी सरकार मानवाधिकारासाठी काम करते का, असे विचारले असता इरोम म्हणाल्या, ‘लोकांनी सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे मोदी कसे आहेत, त्यांचे सरकार कसे आहे, हे जनताच ठरवेल. माझा कोणत्याही पक्षाच्या नव्हे, तर लोकांच्या सरकारवर जास्त विश्वास आहे. आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून इतरांचा विचार केला पाहिजे.’

 

टॅग्स :PuneपुणेSarhadसरहद संस्थाSanjay Naharसंजय नहारVidya Balविद्या बाळ