झोपड्या हटविल्या
By Admin | Updated: November 18, 2016 05:13 IST2016-11-18T05:13:58+5:302016-11-18T05:13:58+5:30
फर्ग्युसन रस्त्यावरील पाटील बंगला परिसरातील काही घरे झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण (एसआरए) यांच्या वतीने बुधवारी सकाळी पाडण्यात आली

झोपड्या हटविल्या
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील पाटील बंगला परिसरातील काही घरे झोपडपट्टी पुनर्वसन विकास प्राधिकरण (एसआरए) यांच्या वतीने बुधवारी सकाळी पाडण्यात आली. या भागातील झोपड्या हलवून तिथे नवी इमारत बांधण्याचा प्रकल्प मंजूर झाला असून, त्याला काही झोपडीधारकांचा विरोध असल्यामुळे ३ पेक्षा जास्त वर्षे हा प्रकल्प रेंगाळला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरून ही कारवाई करण्यात आली.
एसआरएचे वरिष्ठ अधिकारी सुरेश जाधव यांनी सांगितले, की या भागातील झोपड्या हलवून तिथे नवी इमारत करायची व तिथे झोपडीधारकांना घरे द्यायची, सर्व पात्र झोपडीधारकांच्या निवासाची व्यवस्था दुसरीकडे करायची, असा प्रकल्प मंजूर झाला आहे.(प्रतिनिधी)