पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By Admin | Updated: January 2, 2015 00:54 IST2015-01-02T00:54:31+5:302015-01-02T00:54:31+5:30

किरकोळ वादावादीमधून पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने हाताच्या नसा कापून तसेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरूडमधील किष्किंधानगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली.

Husband's suicide by killing his wife | पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पुणे : किरकोळ वादावादीमधून पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने हाताच्या नसा कापून तसेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरूडमधील किष्किंधानगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली.
तेजश्री दीपक जाधव (वय २१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दीपक हरी जाधव (वय ३१, रा. किष्किंधानगर, खंडोबा मंदिरामागे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मूळचा मुळशी तालुक्यातील रहिवासी असलेला दीपक हा सुरुवातीला केटरिंगची कामे करीत होता. नंतर त्याने पेस्ट कंट्रोलची कामे करायला सुरुवात केली होती. परंतु मागील काही दिवसांपासून तो बेकार होता. त्याचा तेजश्रीसोबत २१ जुलै २०१३ रोजी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून हे दोघेही एकटेच राहात होते. त्याचे आठ वर्षांपूर्वी पहिले लग्न झालेले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन लहान मुली आहेत. पहिल्या पत्नीने त्याच्याविरुद्ध घटस्फोटासाठी न्यायालयात दावा लावलेला आहे. तेजश्रीचे आई-वडील वारज्यातील रामनगरमध्ये राहण्यास आहेत. दीपकच्या पहिल्या लग्नावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते.
बुधवारी रात्रीही त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. रात्री बारानंतर शेजारी झोपी गेल्यानंतर त्याने रागाच्या भरात तेजश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हाताच्या नसा कापून लोखंडी आढ्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराला आतून कडी लावलेली असल्यामुळे दिवसभर दार बंदच होते. दुपारी शेजारच्या नागरिकांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शेजारच्या नागरिकांनी पत्रा वाकवून घरामध्ये प्रवेश केला असता दोघा जणांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेजश्रीच्या गळ्यावर सूज होती. तसेच नखांचे व्र्रणही आढळून आले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Husband's suicide by killing his wife