शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या दारूच्या व्यसनामुळे संसाराची झाली दैना; दोघांची झाली फारकत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 17:52 IST

पत्नीने दिलेला पुरावा ग्राह्य धरून क्रूरतेच्या कारणावरून पत्नीला घटस्फोट मंजूर केला...

पुणे :  पती दारू पिल्यानंतर पत्नीशी अमानुषपणे वागायचा.  सतत तिला मारहाण करण्याच्या धमक्या द्यायच्या. त्यामुळे पत्नीला त्याच्याशी संसार करणे अशक्य झाले. तिच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. दोन वषार्पूर्वी पत्नीने पतीला नोटीस पाठवून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सुचविले होते. परंतु पतीने त्यासाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने तिने घटस्फोटासाठी दावा दाखल केला होता. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी अर्जदार पत्नीने दिलेला पुरावा ग्राह्य धरून क्रूरतेच्या कारणावरून पत्नीला घटस्फोट मंजूर केला.

प्रिया आणि प्रथमेश (नाव बदललेले) यांचे लग्नापूर्वी असलेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी दहा वर्षांपूर्वी लग्न केले. प्रियाला प्रथमेशच्या दारूच्या व्यसनाची लग्नाच्या  पूर्वीपासूनच माहिती होती. प्रियाने प्रथमेशकडून वचन घेतले होते की, लग्नानंतर दारू पिणार नाही. परंतु तरीही प्रथमेशने लग्नानंतर दारूचे व्यसन कायम ठेवले. तो दारूच्या अमलाखाली आल्यानंतर प्रियाला मारहाण करायचा व तिच्याकडूनच दारूपिण्यासाठी पैसे मागायचा.

लग्नानंतर एक वर्षांनी त्यांना मुलगी झाली. परंतु तरीही प्रथमेशचे दारूचे व्यसन सुटले नाही. त्याने प्रिया व मुलीच्या पालनपोषणाची कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही. मुलीच्या जन्मानंतर त्याने प्रियाला सांभाळले नाही.  त्यामुळे प्रियाला त्याच्याशी संसार करणे अशक्य झाले होते. दोन वषार्पूर्वी प्रियाने प्रथमेशला नोटीस पाठवून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सुचविले होते. परंतु त्याने त्यासाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीने दिलेला पुरावा ग्राह्य धरून क्रूरतेच्या कारणावरून पत्नीला घटस्फोट मंजूरकेला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड