पत्नीला रंगेहाथ पकडल्याने पतीला केली दगडाने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:13 IST2021-08-27T04:13:43+5:302021-08-27T04:13:43+5:30

पुणे : पत्नीच्या चारित्र्याचा त्याला संशय होता. त्यामुळे पत्नी कोठे जाते, याबाबत त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका ५० ...

Husband stoned his wife to death | पत्नीला रंगेहाथ पकडल्याने पतीला केली दगडाने मारहाण

पत्नीला रंगेहाथ पकडल्याने पतीला केली दगडाने मारहाण

पुणे : पत्नीच्या चारित्र्याचा त्याला संशय होता. त्यामुळे पत्नी कोठे जाते, याबाबत त्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा एका ५० वर्षांच्या व्यक्तीबरोबर आपली २१ वर्षांची पत्नी जात असल्याचे त्याला आढळून आले. त्याने दोघांना रंगेहाथ पकडले. त्याने जाब विचारल्यावर दोघांनी मिळून या तरुणाला बेदम मारहाण करून जखमी केले.

हा प्रकार कोंढव्यातील बिस्मिला हॉलजवळील कम्युनिटी सोसायटीसमोर मंगळवारी साडेचार वाजता घडली.

याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या ३१ वर्षांच्या तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ५० वर्षांची व्यक्ती व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला त्याच्या पत्नीवर संशय होता. फिर्यादी यांची पत्नी घरातून बाहेर पडल्यावर तो तिचा पाठलाग करू लागला. पत्नी एका व्यक्तीबरोबर जात होती. त्याने या दोघांना बिस्मिला हॉल कम्युनिटी सोसायटीच्या समोर अडवले. पत्नी व त्या व्यक्तीला तुम्ही दोघे कुठे जाता, असे विचारले. याचा राग येऊन पत्नीने फिर्यादीला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तिच्याबरोबरील व्यक्तीने दगडाने मारहाण करून जखमी केले. कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Husband stoned his wife to death