पतीवर सुरीने वार, प}ीला अटक
By Admin | Updated: September 17, 2014 00:28 IST2014-09-17T00:28:39+5:302014-09-17T00:28:39+5:30
भाजी कापण्याची सुरी गरम करून पतीच्या पोटात तीनदा भोसकल्याप्रकरणी पत्नीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

पतीवर सुरीने वार, प}ीला अटक
पुणो : भाजी कापण्याची सुरी गरम करून पतीच्या पोटात तीनदा भोसकल्याप्रकरणी पत्नीला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने प}ीला 19 सप्टेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेला आहे.
रखमा शंकर लोखंडे (वय 3क्, रा. वैदूवस्ती, सेनापती बापट रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पती शंकर राजाराम लोखंडे (वय 32, वैदूवस्ती) हा जखमी आहे. ही घटना 13 सप्टेंबर रोजी राहत्या घरी घडली. शंकर हा लघुशंकेसाठी निघाला असता, रखमाने भाजी कापण्याची सुरी गरम केली व त्या क्षणी काहीही कारण घडलेले नसताना श्ांकरच्या पोटात तीनदा खुपसली.
या प्रकरणी रखमाला अटक केली असून, तिला न्यायालयात हजर करण्यात आले. कोणत्या कारणासाठी तिने हे वार केले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्याची सरकारी वकिलांनी विनंती केली. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरला.
(प्रतिनिधी)