चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:12 IST2021-02-13T04:12:41+5:302021-02-13T04:12:41+5:30

याप्रकरणी पती दत्तात्रय सुरेश कसबे (वय ३८) याच्याविरुद्ध पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला ...

The husband set the wife on fire out of suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस पेटविले

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस पेटविले

याप्रकरणी पती दत्तात्रय सुरेश कसबे (वय ३८) याच्याविरुद्ध पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश कसबे हा पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत असे. तुझे बाहेर काहीतरी चालू आहे, असे म्हणत त्याने सुरेखा सोबत भांडणे केली. भांडण असह्य झाल्याने सुरेखा यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले, पती सुरेश याने काडी पेटवून तिला पेटवून दिले. त्यानंतर सुरेश फरार झाला. सुरेखा हिने दिलेल्या तक्रारीवरून सुरेश कांबळे याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गुन्हे अभय महाजन करीत आहेत.

Web Title: The husband set the wife on fire out of suspicion of character