शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने काढला काटा ; पत्नीवर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:28 IST

चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी हद्दीतील भवानी इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीमध्ये ही खुनाची घटना घडली आहे.

चाकण : पत्नीच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने एकाचा खून करून स्वतःच्या पत्नीला देखील लोखंडी स्टूलने जबर मारहाण करत तिला ही ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी येथील एका कंपनीत मंगळवारी (दि.१० ) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास  घडली आहे.  अमोल गजानन राणे ( वय.३८ वर्षे,रा.आळंदी देवाची ) असे खून झालेल्या असिस्टंट मॅनेजरचे नाव आहे.याप्रकरणी गणेश मदनलाल गोलेचा ( वय.३३ ,रा.चाकण ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार चाकण पोलिसांनी रामेश्वर वामन पवार ( वय.३५ ,रा. नाणेकरवाडी ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चाकण परिसरात दोन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

चाकण एमआयडीसीमधील नाणेकरवाडी हद्दीतील भवानी इंडस्ट्रीज प्रा.लि. या कंपनीमध्ये ही खुनाची घटना घडली आहे. या कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीस असणाऱ्या अमोल राणे याचे रामेश्वर पवार यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्यात कंपनीमध्ये मोठा वाद झाला. या वादातून रागाच्या भरात कामगार पवार याने राणे याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला. तसेच आपल्या पत्नीलाही लोखंडी स्टूलने जबर मारहाण करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी कंपनीतून फरार झाला होता. परंतु, चाकण पोलिसांनी वेगाने आपली तपास चक्रे फिरवून चार तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे.

याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :ChakanचाकणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस